अथांग सागराचा अभ्यास करायचा आहे? मग ओशनोग्राफीचा पर्याय जरुर निवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:26 PM2018-07-17T17:26:37+5:302018-07-18T13:52:01+5:30

समुद्राचा विविधांगी अभ्यास करणाऱ्या क्षेत्राला ओशनोग्राफी असं म्हटलं जातं. भारतामध्ये ओशनोग्राफीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजे नॅशनल ओशनोग्राफी इन्स्टीट्यूट ही संस्था कार्यरत आहे.

Want to study about Oceans? Then choose the option of oceanography | अथांग सागराचा अभ्यास करायचा आहे? मग ओशनोग्राफीचा पर्याय जरुर निवडा

अथांग सागराचा अभ्यास करायचा आहे? मग ओशनोग्राफीचा पर्याय जरुर निवडा

ठळक मुद्देओशनोग्राफीमध्ये जैवसंस्थेतील बदल, भूविवर्तनिय हालचाली, सागरतळाची रचना, जिओफिजिकल फ्लूइड डायनामिक्स, सागरी जीव, महासागरांतील प्रवाह यांच्याबद्दल शिक्षण दिले जाते.

मुंबई- भारताला 7517 किमी लांबीचा किनारा लाभला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला 720 किलोमिटर लांबीचा किनारा लाभला आहे. समुद्र जसा त्याच्या विस्तारामुळे अथांग आणि मोठा आहे तसे समुद्राच्या संबंधित करिअर करण्याच्या संधीही विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. समुद्राचा विविधांगी अभ्यास करणाऱ्या क्षेत्राला ओशनोग्राफी असं म्हटलं जातं.
भारतामध्ये ओशनोग्राफीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजे नॅशनल ओशनोग्राफी इन्स्टीट्यूट ही संस्था कार्यरत आहे.  ओशनोग्राफीमध्ये विविध शैक्षणिक संस्था संशोधन व अभ्यासक्रम शिकवतात. ओशनोग्राफीमध्ये जैवसंस्थेतील बदल, भूविवर्तनिय हालचाली, सागरतळाची रचना, जिओफिजिकल फ्लूइड डायनामिक्स, सागरी जीव, महासागरांतील प्रवाह यांच्याबद्दल शिक्षण दिले जाते.

ओशनोग्राफी शिकवणाऱ्या संस्था-
विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठ, चेन्नई येथील अण्णा विद्यापिठातील इन्स्टीट्यूट ऑफ ओशन मॅनेजमेंट, तामिळनाडूतील परनगिपेट्टाईमधील अण्णामलाई विद्यापिठातील सेंटर फॉर अॅडवान्स्ड स्टडी इन मरिन बायोलॉजी, रत्नागिरी येथील मरिन रिसर्च लॅबोरेटरी, तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापिठातील मरिन सायन्सेस डिपार्टमेंट, ओडिशामधील बरहामपूर विद्यापिठातील डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्सेस, कॅलकटा विद्यापिठातील डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्सेस, मुंबई विद्यापिठातील सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ फिशरिज एज्युकेशन,  कोचिन विद्यापिठातील स्कूल ऑफ मरिन सायन्सेस, गोवा विद्यापिठातील डिपार्टनेंट ऑफ मरिन सायन्सेस व डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोटेक्नॉलजी, आयआयटी दिल्लीमधील सेंटर फॉर अॅटमोस्फेरिक सायन्सेस, आयआयटी खरगपूर येथील डिपार्टमेंट ऑफ नावल आर्किटेक्चर,  आयआयटी मद्रास येथील ओशन इंजिनिअरिंग सेंटर, बंगळुरु येथील इनलँड फिशरिज युनिट, कारवार येथील कर्नाटक विद्यापिठातील डिपार्टमेंट ऑफ मरिन बाय़ोलॉजी, केरळ राज्यातील एर्नाकुलम येथील केरला अॅग्रीकल्चर विद्यापिठातील कॉलेज ऑफ फिशरिज, याशिवाय उत्कल विद्यापिठ ओडिशा, मंगळुरु विद्यापिठ, फिशरिज कॉलेज अँड रिसर्च इन्स्टीट्यूट तुतिकोरीन येथे ओशनोग्राफी संबंधित विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येईल.

ओशनोग्राफीतील संशोधन करण्यासाठी संस्था-

  • भाभा अॅटॉमिक रिसर्च इन्स्टीट्यूट- मुंबई, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टीट्यूट- लखनौ
  • सेंट्रल इलेक्ट्रो- केमिकल्स रिसर्ट इन्स्टीट्यूट- कराईकुडी, तामिळनाडू
  • सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर अॅक्वाकल्चर- चेन्नई,
  • सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरी- बंगळुरु
  • सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ ऑफ फिशरिज टेक्नोलजी- कोची,
  • सेट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टीट्यूट- कोची
  • सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टीट्यूट- मंगऴुरु
  • सेंटर फॉर मरिन लिविंग रिसोर्स अँड इकोलॉजी- काकानाड, कोची
  • सेंट्रल मेकॅनिकल रिसर्च इन्स्टीट्यूट- दुर्गापूर
  • सेंट्रल सॉल्ट अँड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टीट्यूट- भावनगर, गुजरात
  • सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला-पुणे
  • सेंटर फॉर अर्थ सायन्सेस स्टडीज-तिरुवनंतपुरम
  • सेंटर फॉर मॅथेमॅटिकल मॉडेलिंग अँड सिम्युलेशन- बंगळुरु
  • इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड ओशन टेक्नॉलजी- ओनजीसी नवी मुंबई

Web Title: Want to study about Oceans? Then choose the option of oceanography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.