मतदान करा अन् मिळवा मोफत जेवणासह औषधांवर सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:48 PM2019-04-08T12:48:06+5:302019-04-08T12:56:23+5:30

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

voters will get discount on medicines and free food in noida | मतदान करा अन् मिळवा मोफत जेवणासह औषधांवर सूट

मतदान करा अन् मिळवा मोफत जेवणासह औषधांवर सूट

Next
ठळक मुद्देमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता व्यापारी संघटनाही पुढाकार घेत आहेत.दिल्लीजवळील नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशनने मतदान करणाऱ्यांना औषधांवर 10 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. मतदान करणाऱ्यांना 'दादी की रसोई'कडून मोफत जेवण देण्यात येणार आहे.

नोएडा - लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता व्यापारी संघटनाही पुढाकार घेत आहेत. दिल्लीजवळील नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशनने मतदान करणाऱ्यांना औषधांवर 10 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. बोटावरील शाई दाखवल्यानंतर 10 टक्के सूट देण्यात येणार आहे.  

मतदान करणाऱ्यांना औषधांवर 10 टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनूप खन्ना यांनी केली आहे. तसेच मतदान करणाऱ्यांना 'दादी की रसोई'कडून मोफत जेवण देण्यात येणार आहे. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक खासगी रुग्णालयांनीही मतदारांसाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत. मतदान केल्यानंतर मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर काही रुग्णालयांनी रुग्ण तपासणी आणि उपचार खर्चात 10 ते 15 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. नोएडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे. 

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने याआधी शुक्रवारी (5 एप्रिल) मतदान करणाऱ्यांना पेट्रोल-डिझेलवर सूट देण्याची घोषणा केली होती. मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रमोट वोटिंग मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनने दिली  आहे. मतदान केल्यानंतर संबंधितांना प्रतिलिटर 50 पैसे सूट दिली जाणार आहे. प्रमोट मोहिमेत सहभागी झालेल्या पेट्रोल पंपांवर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू; चकित झालात?... पण हे खरं आहे!

लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. मात्र देशात एक अशी जागा आहे जिथे हे मतदान सुरूही झालं आहे. चकित झालात?... पण हे खरं आहे. भारत -तिबेट सीमा सुरक्षादलाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या चौकीवर शुक्रवारी (5 एप्रिल) हे मतदान घेण्यात आलं. भारत-तिबेटची ही सीमा अरुणाचल प्रदेशमधून जाते. लोहितपूरमध्ये पोस्टल मतदानाच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) मतदान केलं आहे. यामध्ये 80 पोलिसांचा समावेश होता. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधले मतदान दोन निवडणुकांसाठी मतदान करत आहेत. त्यासोबतच भारत - तिबेट पोलीस दलात देशभरातल्या विविध भागांतून आलेले पोलीस कर्मचारीही आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी हे मतदान केलं आहे. ITBP च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआयजी सुधाकर नटराजन यांनी जवानांमध्ये सर्वप्रथम मतदान केलं आहे. 

 

Web Title: voters will get discount on medicines and free food in noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.