पतीच्या अंत्यसंस्कारांसाठी शशिकला 15 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 05:08 PM2018-03-20T17:08:19+5:302018-03-20T17:12:18+5:30

एम. नटराजन यांच्यावर चेन्नईतील ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

VK Sasikala granted 15 day parole to attend husband funeral | पतीच्या अंत्यसंस्कारांसाठी शशिकला 15 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर

पतीच्या अंत्यसंस्कारांसाठी शशिकला 15 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर

Next

तामिळनाडू: बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांना त्यांचे पती एम. नटराजन यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी 15 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच बंगळुरूच्या तुरुंगातून त्यांना सोडण्यात आले. तेथून शशिकला थेट तंजावर जिल्ह्यातील आपल्या मूळगावी जाणार आहेत. याठिकाणी एम. नटराजन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

एम. नटराजन यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते  76 वर्षांचे होते. एम. नटराजन यांच्यावर चेन्नईतील ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या रविवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एम. नटराजन यांची प्रकृती खालवल्याने त्यांना सोमवारी दुपारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देऊ न शकल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, अनेक अवयव निकामी झाल्याने एम. नटराजन यांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. 

Web Title: VK Sasikala granted 15 day parole to attend husband funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.