Viral सत्य: सरकारचं 'वस्त्रहरण' करणारी 'ही' कविता अटलबिहारी वाजपेयींची नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 03:30 PM2018-08-21T15:30:00+5:302018-08-21T15:35:31+5:30

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झालं.

Viral Truth: 'This' is not a poem by the atal bihari vajpayee | Viral सत्य: सरकारचं 'वस्त्रहरण' करणारी 'ही' कविता अटलबिहारी वाजपेयींची नाही!

Viral सत्य: सरकारचं 'वस्त्रहरण' करणारी 'ही' कविता अटलबिहारी वाजपेयींची नाही!

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर ब-याच गोष्टी व्हायरल झाल्या. 16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये मोदी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर बोलताना त्यांच्या चेह-यावर हास्य फुललेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीनं या फोटोच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वृत्तवाहिनीच्या पाहणीत हा फोटो मोदींचाच असल्याचं समोर आलं.

मोदींचे कपडे आणि बॉडीगार्ड यांचे चेहरे मिळते-जुळते असल्याचंही या फोटोतून स्पष्ट होतेय. परंतु याचा अर्थ वाजपेयींच्या मृत्यूनंतर मोदी हसत असल्याचा दावा करणं चुकीचे ठरेल. कारण मोदी 16 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी वाजपेयींना भेटून बाहेर आले. तर वाजपेयींचं निधन 16 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी झाले. त्यामुळे वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समधील डॉक्टरांबरोबर हसत असल्याचा दावा करणं चुकीचं आहे, कारण मोदी अटलजींच्या निधनानंतर एम्स रुग्णालयात उपस्थितच नव्हते, असं एका वृत्तवाहिनीच्या पाहणीत आढळलं होतं.

त्याच प्रकारे आता सोशल मीडियावर इतरांच्या कविता अटलजींच्या नावावर खपवून त्या व्हायरल करण्यात आल्या आहेत. या कवितेतून अटलबिहारी वाजपेयींनी मोदी सरकारला खडे बोल सुनावल्याचंही सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. परंतु त्या कविता अटलजींनी नव्हे, तर पुष्यमित्र उपाध्याय यांनी लिहिल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होणा-या या कविता अटलजींच्या नव्हत्या, तर त्या भलत्याच कोणाच्या तरी आहेत.
"अटलबिहारी वाजपेयींनी लिहिलेली ही कविता. आजच्या परिस्थितीत ती समोर आली",

उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो
अब गोविन्द न आयेंगे।

कब तक आस लगाओगी तुम
बिके हुए अखबारों से।

कैसी रक्षा मांग रही हो
दु:शासन दरवारों से।

स्वंय जो लज्जाहीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोबिन्द न आयेंगे।

कल तक केवल अंधा राजा
अब गूंगा बहरा भी है।

होंठ सिल दिये हैं जनता के
कानों पर पहरा भी है।

तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे
किसको क्या समझायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोबिन्द न आयेंगे।

छोड़ो मेंहदी भुजा संम्भालो
खुद ही अपना चीर बचा लो।

द्यूत बिठाये बैठे शकुनि
मस्तक सब बिक जायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोविद न आयेंगे।
असा मेसेज लिहून या कविता व्हायरल करण्यात आल्या होत्या. परंतु त्या कविता अटलबिहारी वाजपेयींच्या नसल्याचं उघड झालं आहे.

छोड़ो मेहंदी खड़ग संभालो 
खुद ही अपना चीर बचा लो 
द्यूत बिछाए बैठे शकुनि, 
... मस्तक सब बिक जाएंगे 
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे | 

कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, 
कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से 
स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं 
वे क्या लाज बचाएंगे 
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे 

कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा-बहरा भी है 
होंठ सिल दिए हैं जनता के, कानों पर पहरा भी है 
तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे, 
किसको क्या समझाएंगे? 
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे...
- पुष्यमित्र उपाध्याय
तर या कविता पुष्यमित्र उपाध्याय यांच्या असल्याचंही आता समोर आलं आहे. त्यामुळे मोदींसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणा-या पोस्ट किती ख-या आणि किती खोट्या असतील, याचा काहीही अंदाज लावता येऊ शकत नाही.   

Web Title: Viral Truth: 'This' is not a poem by the atal bihari vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.