VIDEO : सरकारी रुग्णालयात टॉर्चच्या प्रकाशात ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 08:07 AM2018-03-19T08:07:50+5:302018-03-19T08:09:30+5:30

हा प्रकार मोबाईल कॅमेरावर शूट करण्यात आला आहे

VIDEO: A woman is operated upon in torch light at Sadar Hospital | VIDEO : सरकारी रुग्णालयात टॉर्चच्या प्रकाशात ऑपरेशन

VIDEO : सरकारी रुग्णालयात टॉर्चच्या प्रकाशात ऑपरेशन

Next

नवी दिल्ली - एका सरकारी रुग्णालयात टॉर्चच्या साह्याने ऑपरेशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. हा प्रकार मोबाईल कॅमेरावर शूट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ऑपरेशनचा व्हिडिओ व्हारल झाला आहे.

बिहारमधील सहरसा येथील सरकारी रुग्णालयात काल रात्री एका महिलेचे ऑपरेशन टॉर्चच्या साह्याने करण्यात आले आहे. त्यावेळी रुग्णालयात लाईट नसल्यामुळं टॉर्चच्या साह्याने ऑपरेशन करण्यात आलं आहे. सरकारी रुग्णालयाकडून आतापर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जर रुग्णालयात लाईट नव्हती तर ऑपरेशन का करण्यात आलं. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये लाईटची अतिरिक्त सुविधा उपलब्ध नव्हती का? असाही प्रश्न उपस्थित राहतो. 

दरम्यान, दिवसा ऑपरेशन करण्याची सक्ती असताना रात्रीची वेळ का निवडण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे वीज गेल्यावर जनरेटर का सुरु करण्यात आलं नाही, तेही समजू शकलेलं नाही.  



 

गेल्यावर्षी सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे उत्तरप्रदेशमधीलअसेच एक प्रकरण समोर आले होते.  उत्तर प्रदेशातील उन्नावमधल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा पराक्रम केला होता.   लखनऊपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या उन्नावमधील एका सरकारी आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री हा प्रकार घडला होता. टॉर्चच्या प्रकाशात 32 जणांवर मोतिबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलं. हा प्रकार मोबाईल कॅमेरावर शूट करण्यात आला होता. शस्त्रक्रिया झालेले रुग्ण हे उन्नाव आणि शेजारच्या कानपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील गरीब रुग्ण होते. कानपूरमधील जगदंबा सेवा समिती या एनजीओने या रुग्णांना सरकारी आरोग्य केंद्रात आणलं होतं. सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  

 

Web Title: VIDEO: A woman is operated upon in torch light at Sadar Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.