Video : अयोध्या-काशी सोडा, जामा मस्जिद तोडा; भाजपाच्या साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 08:27 AM2018-11-24T08:27:59+5:302018-11-24T10:06:44+5:30

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर मुद्याचं प्रचंड राजकारण सुरू आहे.

Video: uttar pradesh : sakshi maharaj urges people to vandalise jama masjid of delhi first | Video : अयोध्या-काशी सोडा, जामा मस्जिद तोडा; भाजपाच्या साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

Video : अयोध्या-काशी सोडा, जामा मस्जिद तोडा; भाजपाच्या साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

Next
ठळक मुद्देनवी दिल्लीतील जामा मस्जिद तोडा - साक्षी महाराज'मशिदीत देवी-देवतांच्या मूर्ती आढळतील' 'देवांच्या मूर्ती आढळल्या नाही तर फासावर लटकवा'

नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांना पुन्हा प्रभू रामाची आठवण झाली आहे. सध्या देशभरात राम मंदिर मुद्याचं प्रचंड राजकारण सुरू आहे. राम मंदिर उभारणीच्या मागणीवरुन राजकीय नेतेमंडळी मोठ-मोठी आणि वादग्रस्त विधानं करताना दिसत आहेत. याचदरम्यान, भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनीही राम मंदिरासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी नवी दिल्लीतील जामा मशिद तोडण्याचे आव्हान केले आहे. इतकेच नाही तर मशिदीच्या पायऱ्यांमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती आढळतील, असा दावाही केला आहे. 

शुक्रवारी (23 नोव्हेंबर) उन्नावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. ''मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला होता, तेव्हा मी म्हणालो होतो की काशी, मथुरा, अयोध्या सोडा....जामा मस्जिद तोडा. मशिदीच्या पायऱ्यांमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती आढळतील. जर मूर्ती आढळल्या नाही तर मला फासावर लटकवा. मी आजही माझ्या विधानावर ठाम आहे''. 


 

दुसरीकडे, 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू होईल, असा दावादेखील साक्षी महाराज यांनी केला. 
दरम्यान, वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहण्याची साक्षी महाराज यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने करुन त्यांनी वाद ओढावून घेतले आहेत. 

Web Title: Video: uttar pradesh : sakshi maharaj urges people to vandalise jama masjid of delhi first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.