Video: राहुल गांधींनी पुन्हा 'डोळा मारला', टपरीवर जाऊन चहाही प्यायला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 06:23 PM2018-09-17T18:23:03+5:302018-09-17T21:09:50+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा डोळा मारला आहे. राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चहा पिला, समोसा खाल्ला आणि त्यानंतर डोळा मारल्याचे या व्हिडीओत दिसत आहे

Video: Rahul Gandhi again 'eyes blink', goes on foot and take tea in bhopal | Video: राहुल गांधींनी पुन्हा 'डोळा मारला', टपरीवर जाऊन चहाही प्यायला

Video: राहुल गांधींनी पुन्हा 'डोळा मारला', टपरीवर जाऊन चहाही प्यायला

googlenewsNext

मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा डोळा मारला आहे. राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चहा प्यायला, समोसा खाल्ला आणि त्यानंतर डोळा मारल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. काँग्रेसच्या संकल्प यात्रेदरम्यान भोपाळमधील सुल्तानिया रोडवरील प्रसिद्ध राजू टी स्टॉलवर राहुल यांनी चहा पिला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच राहुल यांच्यासोबत सेल्फी काढण्यातही काँग्रेसचे कार्यकर्ते दंग झाले होते. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जणू निवडणुकांचे रणशिंगच फुंकले आहे. आगामी काळात होणाऱ्या मध्य प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे रोड शो केला. यावेळी येथील सुल्तानपूर रोडवरील राजू टी स्टॉलवर चहा आणि समोसे खात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही काढला. यावेळी अचानकपणे राहुल यांनी कार्यकर्त्याला पाहून डोळा मारला. या घटनेचा व्हिडीओ काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. राहुल यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटीझन्सकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.



 

Web Title: Video: Rahul Gandhi again 'eyes blink', goes on foot and take tea in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.