ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 20 - ट्रिपल तलाकला वैतागलेल्या एका महिलेने जाहीरपणे आपण हिंदू धर्मात प्रवेश करु अशी धमकीच दिली आहे. या महिलेच्या बहिणीला तिच्या पतीने तलाक दिला आणि त्यानंतर लगेच दुसरं लग्नही केलं होतं. आपल्या बहिणीची ही व्यथा पाहून संतापलेल्या या मुस्लिम महिलेने किच्छा कोतवाली येथे पोहचल्यानंतर जोरदार हंगामा केला. मुस्लिम महिलांसोबत असा अन्याय होणार असेल तर आपण हिंदू धर्म स्विकारु असंही जाहीर करुन टाकलं."खबर उत्तराखंड"ने याबाबत वृत्त दिलं आहे.
 
उत्तराखंडच्या किच्छा येथे राहणा-या एका महिलेला तिच्या पतीने ट्रिपक तलाक दिला, आणि त्यानंतर दुसरं लग्न केलं. आपल्या बहिणीच्या मदतीसाठी ही महिला किच्छा कोतवाली येथे पोहोचली. तिने पोलिसांकडे मदत मागितली. पण पोलीस जास्त काही करु शकले नाहीत. यानंतर संतापलेल्या महिलेने रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 
 
खबर उत्तराखंडने या महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 
ट्रिपल तलाकच्या नावाखाली महिलांवर असाच अन्याय होणार असेल तर मी हिंदू धर्मात प्रवेश करेन असंही यावेळी ती ओरडून ओरडून सांगत होती. "शेवटपर्यंत आम्ही आमच्या पतीची सेवा करतो, आणि म्हातारपणी हे तीन शब्द बोलून आम्हाला तलाक देतात. यापेक्षा आम्ही हिंदू धर्म स्विकारु. किमान आमचा बायको म्हणून सांभाळ तरी करेल", अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे. यावेळी बोलताना महिलेने नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यराज यांचं कौतुकही केलं.