Video: गुजरात ATSच्या महिला अधिकाऱ्यांची कामगिरी, कुख्यात गुन्हेगाराला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:42 AM2019-05-06T10:42:34+5:302019-05-06T10:43:22+5:30

गुजरात एटीएसच्या चार महिला पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या चार महिला अधिकाऱ्यांनी बोटादच्या घनदाट जंगलात घुसून १५ हत्यांचा आरोप असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत

Video: Dreaded history sheeter Jusab Allarakha nabbed by ATS team including four woman PSI | Video: गुजरात ATSच्या महिला अधिकाऱ्यांची कामगिरी, कुख्यात गुन्हेगाराला केली अटक 

Video: गुजरात ATSच्या महिला अधिकाऱ्यांची कामगिरी, कुख्यात गुन्हेगाराला केली अटक 

googlenewsNext

अहमदाबाद- गुजरातएटीएसच्या चार महिला पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या चार महिला अधिकाऱ्यांनी बोटादच्या घनदाट जंगलात घुसून १५ हत्यांचा आरोप असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुजरातएटीएसला मिळालेल्या माहितीनुसार बोटादच्या जंगलात अवैधरित्या बेकायदेशीर हालचाली होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुजरात एटीएसचे डीआयजी हिमांशु शुक्ला यांनी एक टीम तयार केली. त्यामध्ये 4 महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या टीमने शनिवारी रात्री बोटाद जंगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यानंतर या महिला अधिकाऱ्यांनी चोख कामगिरी बजावत कुप्रसिद्ध डॉन जुसब अलारखा सांध याला अटक केली.  

जसुबला पकडण्यासाठी या अधिकाऱ्यांनी जंगलात मध्यरात्री पायी चालत जाऊन या गुन्हेगाराला घेरले. गुन्हा केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सांध जंगलात लपत असे. जसुबवर अनेक हत्यांचा आरोप आहे.  जुनागढ पोलीस ठाण्यात जसुब अलारखाविरोधात 15 हत्या आणि खंडणीचे आरोप आहेत. जसुब अल्लाराखाला पकडणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या या महिला पोलिसांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

जुसब अलारखाला पकडण्यासाठी तीन महिन्यांपासून तयारी सुरू होती. बोटाद जंगलात तो लपला असल्याची माहिती एटीएसचे जिग्नेश अग्रावत यांना मिळाली होती. यानंतर अरुणाबेन गामित, नितमिका गोहिल, शकुंतलाबेन आणि जिग्नेश अग्रावत यांच्या पथकाकडे ही कामगिरी सोपवण्यात आली अशी माहिती एटीएसच्या सदस्य संतोकबेन ऑडेदरा यांनी दिली. संतोकबेन यांनी सांगितले, गुप्तहेराने सांगितलेल्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी दीड किमी पायी जावे लागले. कारण, गाडी घेऊन जाणे उपयोगाचे नव्हते. तरी पोलिस पाळतीवर असल्याचे आरोपीला समजले. आम्ही तो लपलेल्या भागात रात्रभर दबा धरून बसलो. सकाळी तो बाहेर पडण्याची वाट पाहत होतो. तो बाहेर पडताच त्याला पकडले.

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Video: Dreaded history sheeter Jusab Allarakha nabbed by ATS team including four woman PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.