एन्काऊंटरवेळी तोंडातून बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला मिळणार शौर्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:47 AM2018-10-17T10:47:18+5:302018-10-17T11:05:16+5:30

एन्काऊंटरवेळी बंदूक जाम झाल्यावर तोंडात काढला होता फायरिंगचा आवाज

uttar pradesh police will give award to sub inspector who shouted thain thain during encounter | एन्काऊंटरवेळी तोंडातून बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला मिळणार शौर्य पुरस्कार

एन्काऊंटरवेळी तोंडातून बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला मिळणार शौर्य पुरस्कार

मेरठ: एन्काऊंटरवेळी बंदूक पडल्यावर तोंडानं फायरिंगचा आवाज काढणाऱ्या उत्तर प्रदेश पोलीस दलातील उपनिरीक्षकाची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाला होता. गुन्हेगाराला इशारा देण्यासाठी तोंडातून 'ठाय ठाय' आवाज काढणाऱ्या उपनिरीक्षकांना आता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. 

एन्काऊंटरवेळी उपनिरीक्षक मनोज यांनी बंदूक बंद पडताच प्रसंगावधान राखल्याचं उत्तर प्रदेशपोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी केलं जाणार आहे. त्यासाठी त्यांचं नाव डीजीपींकडे पाठवलं जाईल. उपनिरीक्षक मनोज कुमार यांच्या सहकाऱ्यांनीदेखील त्यांच्या साहसाचं कौतुक केलं आहे. 'माझे सहकारी उपनिरीक्षक यांनी एका हिरोसारखं काम केलं. पोलीस दल याकडे सकारात्मकपणे पाहतं. उपनिरीक्षकांचं बंदूक जाम झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तोंडातून ठाय-ठाय असा आवाज काढला,' असं पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितलं. 




13 ऑक्टोबरला संभलमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. त्यावेळी एका शेतात लपून बसलेल्या गुंडांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी, अचानक पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदूक बिघडली. ही बंदूक जाम झाल्यानं त्यातून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार यांनी तोंडातून फायरिंगचा आवाज काढत गुंडांचा पाठलाग केला. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलीस आणि गुंडांच्या या चमकीवेळी पोलिसांच्या दुसऱ्या पथकानं एका गुंडांच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडलं. मात्र, अचानक बंदूक बंद पडल्यानंतर मनोज कुमार यांनी दाखवलेल्या हुशारीची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

Web Title: uttar pradesh police will give award to sub inspector who shouted thain thain during encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.