Unnao rape case : सेनगरने त्या महिलेवर केला होता बलात्कार, सीबीआयने दिला पीडितेच्या आरोपांस दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 07:42 AM2018-05-11T07:42:10+5:302018-05-11T08:00:58+5:30

उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने पीडित महिलेवर बलात्कार केला होता, असे सांगत त्याच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे.

Unnao rape case: Senegar had raped the woman | Unnao rape case : सेनगरने त्या महिलेवर केला होता बलात्कार, सीबीआयने दिला पीडितेच्या आरोपांस दुजोरा

Unnao rape case : सेनगरने त्या महिलेवर केला होता बलात्कार, सीबीआयने दिला पीडितेच्या आरोपांस दुजोरा

Next

लखनौ -उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने पीडित महिलेवर बलात्कार केला होता, असे सांगत त्याच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने दिलेल्या या माहितीमुळे आरोपी सेनगरच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात चालढकल करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. 
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने  बांगरमऊ येथून भाजपा आमदार असलेल्या कुलदीप सिंह सेनगर याने गतवर्षी 4 जून रोजी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. यादरम्यान सेनगरची महिला सहकारी दाराबाहेर पाहारा देत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सेनगरवर आरोप करत राहिली. मात्र स्थानिक पोलिसांनी 20 जून रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सेनगर आणि अन्य आरोपींची नावे दाखल केली नाहीत. 
 दरम्यान, सीबीआयने सीआरपीसी कलम 164 अन्वये न्यायालयासमोर पीडितेचा जबाब नोंदवून घेतला आहे. या जबाबामध्येही पीडिता आपल्या आधीच्या जबाबावर ठाम राहिली. पोलिसांची पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात उशीर केला, तसेच तिचे कपडे फॉरेंन्सिक लॅबमध्ये पाठवले नाहीत. हे सर्व जाणूनबुजून आणि आरोपींसोबत संगनमत करून करण्यात आले, असा आरोप सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने केला. सीबीआयने एप्रिल महिन्यामध्ये आरोपी सेनगर, शशी सिंह आणि अन्य आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेवरही चौफेर टीका झाली होती. त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपाय सीबीआयकडे वर्ग केला होता.  

आ. सेनगर व त्याच्या भावाने जून २०१७मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. तपास योग्य पद्धतीने होत नसल्याबद्दल तिने ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी त्या मुलीचे वडील पप्पू सिंग यांना अटक केली. दुस-या दिवशी वडिलांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. सिंग यांना पोलीस कोठडीमध्ये आमदारांच्या चार साथीदार आणि पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम अहवालात त्यांना झालेल्या मारहाणीचा उल्लेख होता. तसेच त्यांनीही मृत्यूआधी आपणास कोणी मारहाण केली, हे सांगितले होते. 

Web Title: Unnao rape case: Senegar had raped the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.