अनोखा पक्षिप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, February 08, 2018 4:12am

चेन्नईतले शेखर नावाच्या एका व्यक्तीचं घर नेहमीच विविध प्रकारच्या पोपटांनी भरलेलं असतं. शेखरचा व्यवसाय आहे कॅमेरे दुरुस्त करण्याचं. पण तो रोज हजारो पोपटांना खाऊ घालतो.

तामिळनाडू- चेन्नईतले शेखर नावाच्या एका व्यक्तीचं घर नेहमीच विविध प्रकारच्या पोपटांनी भरलेलं असतं. शेखरचा व्यवसाय आहे कॅमेरे दुरुस्त करण्याचं. पण तो रोज हजारो पोपटांना खाऊ घालतो. दरमहा पोपटांना जेवू घालण्यासाठी तो खिशातील तब्बल आठ हजार रुपये खर्च करतो. रोज तो तीस किलो तांदळाचा भात या पोपटांसाठी तयार करतो आणि गच्चीवर त्याचे लहान घास करून ठेवून देतो. ते पाहताच, अनेक पोपट तिथं उडत येतात. काही तर तो भाताचे घास केव्हा रचतो, याची वाटच पाहत असतात. एकदा सकाळी तो त्यांना जेवू घालतो आणि पुन्हा संध्याकाळी. हा त्याचा अखंड दिनक्रम दहा वर्षांपासून. त्याला दरमहा जे उत्पन्न मिळतं, त्यातील ४0 टक्के रक्कम तो केवळ पोपटांच्या खाण्यावर खर्च करतो. >दहा वर्षांपूर्वी त्याने जेवून झाल्यानंतर उरलेलं अन्न गच्चीवर ठेवलं होतं. त्या वेळी खार, काही पक्षी ते खायला आले. त्यात काही पोपटही होते. ते पाहून त्यानं रोज पक्षांसाठी काही तरी खायला ठेवायला सुरुवात केली. त्यातून येणा-या पोपटांची संख्या यायला सुरुवात झाली. अनेक पोपट तर आता त्याचे मित्र झाले आहेत. ते त्याच्या खांद्यावर, हातावर येऊ न बसतात. तो काम करत असतो, तेव्हा अनेकदा त्याच्या शेजारी पोपटांचा वावर असतो. त्याच्याकडे इतक्या प्रमाणात येणारे पोपट आणि इतर पक्षी पाहायला आता देश-विदेशांतून पक्षिप्रेमी आणि पक्षांचा अभ्यासकही येत असतात.

संबंधित

EVM हॅकिंग : निवडणूक आयोगाने सय्यद शुजाविरोधात पोलिसांत दाखल केली तक्रार
... अन् 59 रुपयांसाठी 50 हजार बँक खात्यांची चौकशी होणार
विवाहबाह्य संबंधांचा संशय; पत्नीने पतीचे कापले गुप्तांग
दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही मग पाकिस्तानात करायचे का? अमित शहांचा ममता बॅनर्जींना सवाल
कारवार दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले

राष्ट्रीय कडून आणखी

आणखी वाचा