ब्रिटनमुळेच मल्ल्याच्या मालमत्ता गोठविणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:56 PM2018-09-19T23:56:26+5:302018-09-19T23:56:55+5:30

कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या याच्यावर कारवाई करण्यास सीबीआय आणि भारतीय बँकांनी टाळाटाळच केली होती.

UK could help frozen Mallya's assets | ब्रिटनमुळेच मल्ल्याच्या मालमत्ता गोठविणे शक्य

ब्रिटनमुळेच मल्ल्याच्या मालमत्ता गोठविणे शक्य

नवी दिल्ली : कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या याच्यावर कारवाई करण्यास सीबीआय आणि भारतीय बँकांनी टाळाटाळच केली होती. मल्ल्या याने स्वीस बँकेत केलेले पैशाचे हस्तांतरण ब्रिटिश सरकारने उघडकीस आणून भारताला अधिकृतरित्या कळविले; त्यामुळे मल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊन ब्रिटनमधील त्याच्या मालमत्ता गोठविता आल्या, अशी माहिती समोर आली आहे.
नोव्हेंबर २0१५ मध्ये मल्ल्या लंडनहून दिल्लीला परतला, तेव्हा त्याला अटक करण्यात येऊ नये, असे लेखी आदेश सीबीआयने जारी केले होते. त्यानंतर चार महिन्यांनी मल्ल्या लंडनला पळाला, तेव्हा त्याला रोखण्यात यावे, असा कायदेशीर सल्ला बँकांना दिला गेला होता. परंतु बँकांनी तो मानला नाही. उलट विजय मल्ल्याला सुखेनैव देशाबाहेर जाऊ देण्यात आले.
त्यानंतर जवळपास वर्षभराने लंडनमधील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याचा स्वित्झर्लंडमधील एका बँकेत १७.८६ दशलक्ष पाउंड (१७0 कोटी रुपये) वळविण्याचा व्यवहार उघडकीस आणला. या व्यवहाराची माहिती ब्रिटिश वित्तीय गुप्तचर शाखेने २८ जून २0१७ रोजी भारताला अधिकृतरित्या दिली. त्यानंतर भारतातील १३ बँकांनी एकत्र येऊन समूह स्थापन केला आणि मल्ल्या याच्या मालमत्ता गोठविण्यासाठी ब्रिटनमध्ये खटला दाखल केला. त्यातून नोव्हेंबर २0१७ मध्ये मल्ल्या यांच्याविरुद्ध मालमत्ता गोठविण्याचा जागतिक आदेश बँकांना मिळाला.

ब्रिटिशांच्या सल्ल्यानंतर हालचाली
सूत्रांनी सांगितले की, मल्ल्या याने स्वीस बँकेत हस्तांतरित केलेल्या पैशांचा व्यवहार ब्रिटिश गुप्तचरांनी संशयास्पद कारवाया अहवालात (एसएआर) रूपांतरित केला. ही माहिती सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) रितसर कळविण्यात आली.त्यानंतर दोन्ही देशांच्या अधिकाºयांची एक बैठक झाली.

सर्व मालमत्तांची विल्हेवाट लावण्याआधीच मल्ल्या याला रोखा, असा सल्ला ब्रिटिश अधिकाºयांनी बैठकीत दिला. त्यानुसार भारतीय तपास संस्था व बँकांनी हालचाली केल्या.
स्वीस बँकेत जाणारे पैसे वेळेअभावी रोखता आले नाहीत, मात्र ब्रिटनधील १.१४ अब्ज पाउंडांची मल्ल्यांची मालमत्ता गोठविली गेली.

Web Title: UK could help frozen Mallya's assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.