पुद्दुकोट्टाईत जलिकट्टू दरम्यान दोघांचा मृत्यू, 31 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:50 AM2019-01-21T10:50:49+5:302019-01-21T11:23:00+5:30

तमिळनाडूच्या पुडुकोट्टईमध्ये रविवारी (20 जानेवारी) जलिकट्टू या पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत.

Two people died during Jallikattu event in Puddukottai | पुद्दुकोट्टाईत जलिकट्टू दरम्यान दोघांचा मृत्यू, 31 जण जखमी

पुद्दुकोट्टाईत जलिकट्टू दरम्यान दोघांचा मृत्यू, 31 जण जखमी

Next
ठळक मुद्देतमिळनाडूच्या पुडुकोट्टईमध्ये रविवारी जलिकट्टू या पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते.खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. रविवारी सर्वाधिक वळू मैदानात उतरवण्याचा विश्वविक्रम रचण्यात आला. 

पुद्दुकोट्टाई - तमिळनाडूच्या पुडुकोट्टईमध्ये रविवारी (20 जानेवारी) जलिकट्टू या पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. राम आणि सतीश अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. खेळात सहभागी झालेले असताना वळूने हल्ला चढवल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सर्वाधिक वळू मैदानात उतरवण्याचा विश्वविक्रम रचण्यात आला. 

तमिळनाडूचे आरोग्य मंत्री विजयभास्कर यांच्या वतीने वीरालिमलई येथे या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये जवळपास 1,345 वळूंचा सहभाग नोंदवण्यात आला. ज्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे 424 स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खेळात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 



वर्ल्डकिंग्स वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जवळपास दुपटीने वळूंची संख्या पाहायला मिळत आहे. याआधी  16 जानेवारी रोजी शिवागंगाई जिल्ह्यात जलिकट्टू खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: Two people died during Jallikattu event in Puddukottai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.