काश्मिरमधील शोपियान येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 04:33 PM2019-04-06T16:33:26+5:302019-04-06T17:50:30+5:30

लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आघाडी उघडली असून, आज शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे

Two militants were killed in an encounter in Shopian in Kashmir | काश्मिरमधील शोपियान येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मिरमधील शोपियान येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

Next

श्रीनगर - लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आघाडी उघडली असून, आज शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. अखेरीस लष्कराने लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. 


याआधी पुलवामा जिल्ह्यात याच आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याआधी गेल्या आठवड्याच शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते.  

Web Title: Two militants were killed in an encounter in Shopian in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.