Two jawans including Major were killed in Pakistan attack | पाकिस्तानच्या हल्ल्यात मेजरसह दोन जवान शहीद
पाकिस्तानच्या हल्ल्यात मेजरसह दोन जवान शहीद

राजौरी : नियंत्रण रेषेवरील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाऴी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये एका मेजरसह दोन जवान शहीद झाले आहेत. तसेस आणखी दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 


सीमेवर शुक्रवारी सायंकाळी एक मोठा आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला आहे. हा स्फोट पाकिस्तान रेंजर्सच्या बॉर्डर अॅक्शन टीमने घडविला असल्याचे समजते. बॅट टीमने गेल्या 24 तासांमध्ये हा दुसरा हल्ला केला आहे. या हल्ल्याबातची अधिक माहिती अद्याप समजलेली नाही. 
याच आठवड्यात मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय सैन्याच्या एका गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर दहशतवादी लपले होते. यानंतर सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये एक दहशतवादी मारला गेला होता. 


Web Title: Two jawans including Major were killed in Pakistan attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.