संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:17 AM2018-09-18T11:17:28+5:302018-09-18T11:34:21+5:30

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन जणांच्या उत्तराखंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Two Arrested in Uttarakhand For Chatting About Killing Defence Minister Nirmala Sitharaman | संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना अटक

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना अटक

Next

देहराडून (पिथौरागड) - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन जणांच्या उत्तराखंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निर्मला सीतारामन पिथौरागड जिल्ह्यात एका वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनासाठी येण्यापूर्वी या दोघांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक रामचंद्र राजगुरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येसंदर्भातील माहिती समोर आली. सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली'. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? दोघंही हत्यारं बाळगत होते का?, याबाबतची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.  
 
शिवाय, ज्या ग्रुपवर सीतारामन यांच्या हत्येसंदर्भातील चॅट सुरू होते, त्या ग्रुप अॅडमिनची देखील चौकशी करण्यात आली आहे. या ग्रुपमध्ये चॅट करणाऱ्या व्यक्तीनं असे म्हटले होते की, 'निर्मला सीतारामनचा उद्याचा शेवट दिवस असेल. मी सीतारामनवर गोळ्या झाडेन. '
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या प्रकरणी सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र दोघांनीही दारूच्या नशेत असताना चॅटिंग केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.  

Web Title: Two Arrested in Uttarakhand For Chatting About Killing Defence Minister Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.