पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिदनापूर येथील सभेदरम्यान मंडप कोसळला, 20 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 02:37 PM2018-07-16T14:37:20+5:302018-07-16T14:59:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20  जण जखमी झाले आहेत.

Twenty people were injured in a tent collapse between Prime Minister Narendra Modi's Midnapore rally | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिदनापूर येथील सभेदरम्यान मंडप कोसळला, 20 जण जखमी 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिदनापूर येथील सभेदरम्यान मंडप कोसळला, 20 जण जखमी 

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20  जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.




पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी मंडप उभारण्यात आला होता. दरम्यान, मोदींचे  भाषण सुरू असतानाच या मंडपाचा काही भाग सभेसाठी उपस्थित असलेल्यांवर कोसळला. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले. सतत पाऊस पडत असल्याने मैदानातील माती ओली झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  



 



 

 

Web Title: Twenty people were injured in a tent collapse between Prime Minister Narendra Modi's Midnapore rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.