Triple talaq bill scheduled to be tabled in Rajya Sabha | राज्यसभेत आज सादर होणार ट्रिपल तलाक विधेयक, काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

नवी दिल्ली -  ट्रिपल तलाकचे विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. मात्र  राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यानं भाजपाची आज अग्निपरीक्षा असणार आहे. महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी (28 डिसेंबर 2017)बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यात सरकारचा कस लागणार आहे.