ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 11 - तृणमुल कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अवमानकारक शब्दांचा वापर केला आहे. भाजपाकडून कल्याण बॅनर्जींविरोधात पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलिस स्थानकात  तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी बॅनर्जींविरोधात कारवाई करावी अशी मागणी भाजपाने केली आहे. 
 
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एका रॅलीदरम्यान बॅनर्जी म्हणाले, मोदींचे समर्थक त्यांना सिंह म्हणतात, पण ती वेळ दूर नाही जेव्हा मोदी गुजरातमध्ये उंदराच्या पिल्लाप्रमाणे (चूहे के बच्चे) आपल्या बिळात परततील.  इंडिया टुडेसोबत बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिला तसेच मीडियावर मोदींच्या समर्थनार्थ काम करण्याचा आरोप लावला. 
 
तृणमुल कॉंग्रेस नोटाबंदीचा विरोध करत आहे. ममता बॅनर्जींनी मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात अभियान सुरू केलं आहे.