ममतांना पुन्हा झटका; 24 तासात तिसरा आमदार भाजपात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:26 PM2019-05-29T17:26:41+5:302019-05-29T17:32:37+5:30

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

Trinamool Congress MLA Manirul Islam joins Bharatiya Janata Party in Delhi | ममतांना पुन्हा झटका; 24 तासात तिसरा आमदार भाजपात 

ममतांना पुन्हा झटका; 24 तासात तिसरा आमदार भाजपात 

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

तृणमूल काँग्रेसचे आमदार मुनीरुल इस्लाम यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे. मुनीरुल इस्लाम यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेता गदाधर हाजरा, मोहम्मद आसिफ इकबाल आणि निमई दास सुद्धा भाजपात सामील झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील मिळालेल्या यशानंतर भाजपाने ममता बॅनर्जींना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पार्टीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.


ममता बनर्जी यांच्या जवळचे नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाने सुरु केला आहे. कालच तृणमूल काँग्रेसचे आमदार सुभ्रांशु रॉय, तुष्क्रांति भट्टाचार्य यांच्यासह 50 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

भाजपाच्या धक्क्यानंतर ममतांच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल
लोकसभा निवडणुकीत झालेला परिणाम लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेटमध्ये फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला उत्तर बंगाल आणि जंगलमहल परिसरात यश मिळवता आले नाही. यातच, या भागातून निवडून येणारे विनोय कृष्णा वर्मन आणि शांतिराम महतो यांच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. तर सुब्रता मुखर्जी, शुभेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी आणि ब्रात्या बसू यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.  

ममतांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही - राहुल सिन्हा
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,'पश्चिम बंगालमध्ये सहा महिने ते एक वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होतील. सध्याचे सरकार 2021 पर्यंत टिकणार नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार पोलीस आणि सीआयडीच्या दबावाखाली चालत आहे.' 
 

Web Title: Trinamool Congress MLA Manirul Islam joins Bharatiya Janata Party in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.