सर्जिकल स्ट्राइकचा एवढा गवगवा करायची गरज नव्हती; निवृत्त लष्करीअधिकाऱ्याचा 'स्ट्राइक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 02:05 PM2018-12-08T14:05:21+5:302018-12-08T14:15:51+5:30

लष्करी मोहिमांचं राजकारण करणे योग्य नाही, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.एस.हुड्डा यांनी व्यक्त केले. शिवाय, सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आल्या प्रकरणीही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

too Much Hype Over Surgical Strike: Ex-Army Officer | सर्जिकल स्ट्राइकचा एवढा गवगवा करायची गरज नव्हती; निवृत्त लष्करीअधिकाऱ्याचा 'स्ट्राइक'

सर्जिकल स्ट्राइकचा एवढा गवगवा करायची गरज नव्हती; निवृत्त लष्करीअधिकाऱ्याचा 'स्ट्राइक'

Next
ठळक मुद्दे'सर्जिकल स्ट्राइकचा अतिरंजित प्रचार कशासाठी''लष्करी मोहिमांचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही'

नवी दिल्ली - लष्करी मोहिमांचं राजकारण करणे योग्य नाही, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.एस.हुड्डा यांनी व्यक्त केले. शिवाय, सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आल्या प्रकरणीही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सप्टेंबर 2016मध्ये भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली. उरी दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्करानं उद्धवस्त केले. या कारवाईच्या वेळेस डी.एस.हुड्डा उत्तरी सैन्य विभागाचे कमांडर होते.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'सर्जिकल स्ट्राईक कारवाईचा एवढा गवगवा करण्याची आवश्यकता नव्हती'. 'रोल ऑफ क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन्स अँड सर्जिकल स्ट्राइक' या विषयावर संबोधित करत असताना त्यांनी आपलं परखड मत यावेळेस व्यक्त केले. 

हुड्डा पुढे असंही म्हणाले की, एका लष्करी मोहिमेचा व्हिडीओ आणि फोटो लीक करुन या विषयाला राजकीय रंग देण्यात आला. जर तुम्ही लष्करी मोहिमेचं राजकारण करू इच्छिता तर हे योग्य नाही. 

(सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी)



दरम्यान, अनेकदा राजकीय व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाच्या कित्येक नेत्यांवर सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय लाटण्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता लष्कराशी संबंधितच एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यानं केलेल्या टिप्पणीवरुन सर्जिकल स्ट्राइक कारवाईवर करण्यात आलेल्या राजकारणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. 

Web Title: too Much Hype Over Surgical Strike: Ex-Army Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.