Today's Fuel Price: In Mumbai, petrol & diesel priced at Rs 74.16/litre & Rs 65.12/litre. | Today's Fuel Price: पेट्रोल 20 पैशांनी, डिझेल 7 पैशांनी स्वस्त
Today's Fuel Price: पेट्रोल 20 पैशांनी, डिझेल 7 पैशांनी स्वस्त

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे.मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 74.16 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 65.12 रुपये मोजावे लागणार आहेत.राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 7 पैशांनी स्वस्त झालं आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.16 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 7 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 65.12 रुपयांवर आला आहे. 

दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 68.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 7 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 62.24 रुपयांवर आला आहे.

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)



गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 


(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)
 

English summary :
Today's Fuel Price In Mumbai: Petrol is cheaper by 20 paise in Mumbai today. Therefore, Mumbaikars will have to pay Rs 74.16 for petrol today. Diesel rates have declined by 7 paise. So, the price of diesel in Mumbai is Rs 65.12.


Web Title: Today's Fuel Price: In Mumbai, petrol & diesel priced at Rs 74.16/litre & Rs 65.12/litre.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.