भारतीय इंटरनेट बाजारात TikTok देणार फेसबुकला टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 09:05 AM2019-05-14T09:05:48+5:302019-05-14T09:06:29+5:30

भारतात फेसबुक आणि टिकटॉकमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. नवीन युजर्संना आपल्याकडून जोडून घेण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये काटे की टक्कर लागली आहे

Tiktok Users Increased In India Challenge For Facebook | भारतीय इंटरनेट बाजारात TikTok देणार फेसबुकला टक्कर 

भारतीय इंटरनेट बाजारात TikTok देणार फेसबुकला टक्कर 

Next

बंगळुरु - भारतात फेसबुक आणि टिकटॉकमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. नवीन युजर्संना आपल्याकडून जोडून घेण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये काटे की टक्कर लागली आहे. जास्तीत जास्त युवकांना आकर्षिक करण्यासाठी दोन्ही कंपन्या सज्ज आहे. चीनमधील टिकटॉक कंपनी भारतीय इंटरनेट बाजारवर फेसबुकला आव्हान देत आहे. त्यामुळे अमेरिकेतील फेसबुक ही सोशल मिडीया कंपनीला इंटरनेट बाजारात आपला दबदबा कायम राखण्याचं आव्हान आहे. 

मार्केट तज्ज्ञ फर्म सेंसर यांच्यानुसार 2019 मध्ये पहिल्या तीन महिन्यात जवळपास 18.8 कोटी युजर्सने टिकटॉक डाऊनलोड केला आहे. यामध्ये 47 टक्के वाटा हा भारतीय युजर्सचा आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत फेसबुक डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 17.6 कोटी इतकी आहे. या तीन महिन्यात फेसबुकला 21 टक्के नवीन युजर्स भारतातून मिळाले. याआधी 2018 च्या शेवटी फेसबुक सर्वात जास्त डाऊनलोड करणारा अ‍ॅप होता. मात्र या नवीन आकडेवारीमुळे फेसबुकची डोकेदुखी वाढणार आहे. तरीही फेसबुकचा वापर डेस्कटॉपवर करता येणे ही कंपनीसाठी दिलासादायक बाब आहे. 

टिकटॉकने इकोनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार भारतात येणाऱ्या काळात 20 ते 40 कोटी युजर्स टिकटॉक या सोशल मिडीया अ‍ॅपचा वापर करतील. आपल्या जीवनातील आनंद मित्रमैत्रिणींसोबत सामुहिकरित्या साजरा करु शकतील. त्यामुळे भारताचं मार्केट आमच्यासाठी महत्त्वपूर्ण मार्केट आहे. स्टैटिस्टाच्या म्हणण्यानुसार भारतात फेसबुकचे आत्ता 30 कोटी युजर्स आहेत. तर 20 कोटी युजर्स टिकटॉकचा वापर करतात. टिकटॉकच्या 20 कोटी युजर्संपैकी 12 कोटी युजर्सं सरासरी महिनाभर वापर करतात. तर 2020 पर्यंत भारतात 67 टक्के इंटरनेट युजर्संचे वय 35 वर्षापेक्षा कमी असणार आहे. 

जाहिरात आणि मिडीया तज्ज्ञांतील लोकांचे म्हणणे आहे की, शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉक सध्यातरी फेसबुकला आव्हान देऊ शकणार नाही कारण अमेरिका सोशल मिडीया कंपनी फेसबुककडे जाहिरातदारांसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. मात्र भारतातील नव्या युजर्संना आपल्याकडे आकर्षिक करण्याचं मोठं आव्हान दोन्ही कंपन्यांना असणार आहे. 

Web Title: Tiktok Users Increased In India Challenge For Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.