तीन फुटी दहशतवाद्याचा काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:45 AM2017-10-20T01:45:31+5:302017-10-20T01:51:20+5:30

अवघ्या तीन फूट उंचीच्या एका दहशतवाद्याने काश्मीर खो-यातील सुरक्षा दलांचा त्रास वाढवला आहे. गेल्या काही काळापासून खो-यामध्ये जे हल्ले झाले आहे, त्यात या बुटक्या दहशतवाद्याचा हात असल्याचे आढळून आले आहे.

 The three-foot terrorists started searching in Kashmir, a series of attacks | तीन फुटी दहशतवाद्याचा काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध

तीन फुटी दहशतवाद्याचा काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध

Next

श्रीनगर : अवघ्या तीन फूट उंचीच्या एका दहशतवाद्याने काश्मीर खो-यातील सुरक्षा दलांचा त्रास वाढवला आहे. गेल्या काही काळापासून खो-यामध्ये जे हल्ले झाले आहे, त्यात या बुटक्या दहशतवाद्याचा हात असल्याचे आढळून आले आहे. श्रीनगर विमानतळापाशी सीमा सुरक्षा दलाच्या असलेल्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्याशीही त्याचा संबंध होता.
तो अवघ्या तीन फुटांचा असल्यामुळे त्याला ओळखणे सोपे आहे, असे पोलीस सांगत असले तरीही तो त्यांना अद्याप सापडलेला नाही. त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जैश-ए-मोहम्मद या संघटनेची दक्षिण काश्मीरमधील धुरा सांभाळणाºया या दहशतवाद्याचे नाव नूर मोहम्मद तंत्रे आहे. संसदेवर २00१ साली झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार गाजीबाबा याचा नूर मोहम्मद हा विश्वासातील साथीदार होता.
तो त्रालमधून सूत्रे हाकत आहे. नूर मोहम्मदला २००३ साली दिल्लीत अटक झाली होती. तेव्हा त्याच्याकडून तब्बल १९ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. पुढे न्यायालयाने दहशतवादविरोधी कायद्याखाली दोषी ठरवून त्याला २०११ साली जन्मठेपेची शिक्षाही सुनावली. काही काळ तिहारच्या तर नंतर श्रीनगर येथील तुरुंगात काढल्यानंतर तो पॅरोलवर बाहेर आला आणि पुन्हा तुरुंगात परतलाच नाही.
बाहेर आल्यानंतर त्याने जैश-ए-मोहम्मदसाठी काम सुरू केले. काश्मीरच्या दक्षिण भागांत ज्या कारवाया होत आहेत, त्यात नूर मोहम्मद व मुफ्ती वकार यांचा हात आहे. पुलवामा जिल्ह्यात आॅगस्टमध्ये पोलिसांवर जो हल्ला झाला, त्यातही नूर मोहम्मदचा हात होता, असा अंदाज आहे. त्या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे आठ जवान हुतात्मा झाले होते, तर तीन दहशतवादी ठार झाले होते. (वृत्तसंस्था)

मंत्र्यावरही हल्ला

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमातळाजवळ असलेल्या बीएसएफ कॅम्पवर ३ आॅक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात होता. त्या वेळी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. पण बीएसएफचा एक अधिकारीही शहीद झाला होता. जम्मू-काश्मीरचे सार्वजनिक बांधकाममंत्री नईम अख्तर यांच्यावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याशीही त्याचा संबंध होता.

Web Title:  The three-foot terrorists started searching in Kashmir, a series of attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.