भूत बनलेला चोरही पोलिसांनी शोधलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 03:11 AM2017-07-28T03:11:42+5:302017-07-28T03:11:45+5:30

चोरी करण्यासाठी धाडसी लोक काहीही करू शकतात व करतातही. अशाच एका चोराने आपण पकडले जाऊ नये म्हणून स्वत:ला भूत बनवले. हे भूत बनणे म्हणजे भुताचे काल्पनिक कपडे घालणे होते.

thieves were found by the police | भूत बनलेला चोरही पोलिसांनी शोधलाच

भूत बनलेला चोरही पोलिसांनी शोधलाच

Next

चोरी करण्यासाठी धाडसी लोक काहीही करू शकतात व करतातही. अशाच एका चोराने आपण पकडले जाऊ नये म्हणून स्वत:ला भूत बनवले. हे भूत बनणे म्हणजे भुताचे काल्पनिक कपडे घालणे होते. परंतु हे महाशय सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये पकडले गेले व पोलिसांकडूनही. चोराने सीसीटीव्ही कॅमेºयात आपली ओळख न पटण्यासाठी अंगाभोवती पांढरी चादर गुंडाळून घेतली. या कॅमेºयाने जे चित्रीकरण केले त्यावरून चोराने जिन्याच्या पायºया चढल्याचे व हॉलमधील कानाकोपºयात पाहिल्याचे दिसते. हा प्रकार आग्नेय चीनच्या फुजियान प्रांतातील जिनजियांग कुअनझोवू शहरात घडला.
हा चोर समोरच्या भिंतीवरील कॅमेºयात तो टिपला गेला. त्याच्या योजनेनुसार या चोराला भुताचे कपडे अंगावर घालण्यासाठी २० मिनिटे लागली. मग तो त्या पांढºया कपड्यांत आला व भूत जसे अचानक अदृश्य होते असा समज आहे त्याप्रमाणे तो घटनास्थळाहून निघून जायच्या आधी कॅमेºयासमोर चुळबुळ करताना दिसतो.
नंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्याने भुताचे कपडे बनवण्यासाठी पडदा वापरल्याचे पोलिसांना दिसले. चोर काही ना काही तरी चूक करतोच, असे पोलिस म्हणतात त्यानुसार हा चोर भूत ते कपडे अंगावर चढवायच्या आधी कॅमेºयात स्पष्टपणे दिसतो. या चोराला त्या घरात चोरी करण्यात अपयश आले व पोलिसांनी त्याला शोधले.
चौकशीत त्याने इतर गुन्ह्यांचीही कबुली दिली आता तो कोठडीत आहे.

Web Title: thieves were found by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.