९० रेल्वे स्थानके होणार विमानतळासारखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:49 AM2018-08-06T04:49:47+5:302018-08-06T04:50:03+5:30

महाराष्ट्रातील सहा व देशातील ८४ अशा ९० रेल्वे स्थानकांना विमानतळांसारखे विकसित करण्याची नरेंद्र मोदी सरकारची योजना राबविण्यासाठी त्यात मोठे बदल केले आहेत.

 There will be 90 railway stations like the airport | ९० रेल्वे स्थानके होणार विमानतळासारखी

९० रेल्वे स्थानके होणार विमानतळासारखी

Next

- नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहा व देशातील ८४ अशा ९० रेल्वे स्थानकांना विमानतळांसारखे विकसित करण्याची नरेंद्र मोदी सरकारची योजना राबविण्यासाठी त्यात मोठे बदल केले आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांनी उत्साह न दाखविल्यामुळे हे बदल केले आहेत.
पुनर्विकास योजनेतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, वाय फाय, इमारतीचे नूतनीकरण, मॉड्यूलर वॉटर कियोस्क, पाण्यासाठी एटीएम, एलईडी लाइट्स, लिफ्ट आणि स्वयंचलित जिने, स्टेनलेस स्टीलची बाके, खाद्यपदार्थांच्या मॉड्यूलर कियोस्कसह अनेक सोईसुविधा उपलब्ध होतील. बांधा-वापरा-हस्तांतर (बीओटी) करा योजनेत स्थानकांवर वेटिंग हॉल, विश्रांती कक्ष, स्वच्छतागृहदेखील विमानतळासारखे आरामदायी आणि सुविधायुक्त बनविले जाईल. सगळे काम रेल्वेची संपत्ती आणि दुसऱ्या संसाधनांचा व्यावसायिक वापर करून केले जाणार होते. यासाठी रेल्वेच्या रिकाम्या असलेल्या जमिनीवर व्यावसायिक संपत्ती तयार करून आर्थिक स्त्रोत एकत्र केले जाणार होते.
ज्या ९० स्थानकांना विकसित केले जाणार आहे त्यात महाराष्ट्रातील सहा स्थानकांचा समावेश आहे. त्यात शिवाजीनगर, सोलापूर, वर्धा, पुणे, इगतपुरी आणि लोणावळाचा समावेश आहे.
अनेक स्टेशनांवर काम सुरू
भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळालाही अनेक स्थानकांच्या विकासाचे काम दिले आहे. त्यात शिवाजीनगर, आनंद विहार, बिजवासन, चंदीगड, गांधीनगर, हबीबगंज (भोपाळ) आणि सूरत रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
ठाणे, मडगावसह पुड्डुचेरीसह एकूण १० स्थानकांसाठी करार झाला
आहे.

Web Title:  There will be 90 railway stations like the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.