गुजरातमधील EVM आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:55 PM2017-12-19T16:55:04+5:302017-12-19T18:45:32+5:30

गुजरातमध्ये प्रतिकूल वातावरणातही निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यापासून विरोधकांनी  ईव्हीएम  आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आता विरोधकांच्या आरोपांदरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 

There have been important information about EVM and VVPAT machines in Gujarat | गुजरातमधील EVM आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती आली समोर

गुजरातमधील EVM आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती आली समोर

Next

अहमदाबाद - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत भाजपाने सत्ता राखण्यात यश मिळवले. मात्र प्रतिकूल वातावरणातही निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यापासून विरोधकांनी  ईव्हीएम  आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. पाटीदार अनामत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने तर हा ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप केला आहे. मात्र विरोधकांच्या आरोपांदरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 
गुजरात विधानसभेच्या 182 मतदार संघांमधील 182 मतदान केंद्रांमधील VVPAT मशीन आणि ईव्हीएममशीन मधील आकडेवारी एकमेकांशी जुळवून पाहण्यात आली आहे. त्यामध्ये VVPAT आणि ईव्हीएममधील आकडे एकमेकाशी मिळतेजुळते असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत होत असलेले आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.
यादरम्यान  ईव्हीएमबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.  ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येऊ शकत नसल्याचे त्यांनी  मह्टले आहे. राजपूत म्हणाले, " कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी मी सर्वांना विनंती करतो. ईव्हीएम आणि VVPAT मशीन पूर्णपणे सुरक्षित असून, त्याद्वारे होणाऱ्या निवडणुका निष्पक्षपाती आहेत." 
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने ईव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मिळून ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडले पाहिजे असे आवाहन केले होते. 
 गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला एकापाठोपाठ एक आरोप करून हैराण करणाऱ्या हार्दिक पटेलने मतदान आटोपल्यापासून ईव्हीएमवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली होती. अहमदाबादमधील एका कंपनीचे 140 इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला होता. 

Web Title: There have been important information about EVM and VVPAT machines in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.