Video : वर्गात मिशीवर ताव देत होता विद्यार्थी, शिक्षकाने मिशीच कापली ; बजरंग दल नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 10:36 AM2018-02-18T10:36:32+5:302018-02-18T10:36:46+5:30

हा विद्यार्थी वर्गामध्ये वारंवार मिशांवर ताव देत होता. असं न करण्याचा इशारा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला दिला होता. पण शिक्षकांनी सांगितल्यानंतरही तो मिशांवर ताव देतच होता

teacher cut student mustache of student in the class complaint lodged by bajrang dal | Video : वर्गात मिशीवर ताव देत होता विद्यार्थी, शिक्षकाने मिशीच कापली ; बजरंग दल नाराज

Video : वर्गात मिशीवर ताव देत होता विद्यार्थी, शिक्षकाने मिशीच कापली ; बजरंग दल नाराज

Next

उत्तर प्रदेशच्या खुर्जा क्षेत्रात एक वेगळीच घटना समोर आली आहे. वर्गात मिशीवर ताव मारणा-या एका विद्यार्थ्याची शिक्षकाने मिशा कापल्याची ही घटना आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून या घटनेला सांप्रदायिक रंग दिला जात आहे. विद्यार्थ्याच्या मिशा कापल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाने शिक्षकाविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनुसार, ज्या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडली तो खुर्जा येथील  शिवम टेक्नीकल कॉलेजमध्ये बी. फार्माचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. 
हा विद्यार्थी वर्गामध्ये वारंवार मिशांवर ताव देत होता. असं न करण्याचा इशारा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला दिला होता. पण शिक्षकांनी सांगितल्यानंतरही तो मिशांवर ताव देतच होता,  त्यामुळे संबंधित शिक्षक नाराज झाले आणि त्यांनी विद्यार्थ्याची थेट मिशी कापून टाकली अशी माहिती एका सहकारी विद्यार्थ्याने दिली. jansatta.com ने याबाबत वृत्त दिलं आहे. 
शिक्षक आणि विद्यार्थी दोघंही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे या घटनेला सांप्रदायिक रंग मिळाला आहे. बजरंग दलाने याबाबत नाराजी जाहीर केली असून पोलीस स्थानकात तक्रार देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी करून कारवाई कऱण्याचं आश्वासन दिलं आहे. तर दुसरीकडे संबंधित शिक्षकाला पदच्युत करण्यात आल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ -

    

Web Title: teacher cut student mustache of student in the class complaint lodged by bajrang dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.