चहा विक्रेत्याच्या मुलीला 3.8 कोटींची मिळाली शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 01:06 PM2018-06-18T13:06:09+5:302018-06-18T13:06:50+5:30

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याच्या मुलीला अमेरिकेतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

A tea vendor's daughter got 3.8 crores scholarship | चहा विक्रेत्याच्या मुलीला 3.8 कोटींची मिळाली शिष्यवृत्ती

चहा विक्रेत्याच्या मुलीला 3.8 कोटींची मिळाली शिष्यवृत्ती

ठळक मुद्देचहा विक्रेत्याच्या मुलीला मिळाली 3.8 कोटींची शिष्यवृत्तीमेरिकेतील बॉबसन महाविद्यालयात प्रवेश मिळालाबारावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली

बुलंदशहर : उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याच्या मुलीला अमेरिकेतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. सुदीक्षा भाटी असे या मुलीचे नाव असून तिने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत 98 टक्के मार्क्स मिळविले आहेत. गरिबीवर मात तिने मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तिला ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
बारावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून सुदीक्षा भाटी जिल्ह्यात पहिली आली आहे. तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बॉबसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तसेच, या चार वर्षाच्या कोर्ससाठी तिला 3.8 कोटींची शिष्यवृत्तीही मिळाली आहे. यावेळी सुदीक्षा भाटी म्हणाली की, सुरुवातीला शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न मला कठीण वाटत होते. 2011 मध्ये मला विद्याज्ञान लीडरशीप अकादमी शाळेत प्रवेश मिळाला. त्यानंतर शिक्षण सुरू ठेवणे मला सोपे झाले. या शाळेत मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिकतात. त्यामुळे मलाही या शाळेत शिकण्याची संधी मिळाली. मात्र, सुरुवातीच्या काळात माझ्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शिक्षणासाठी विरोध दर्शविला होता. परंतू माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. 
शिष्यवृत्ती मिळाल्याचे समजल्यानंतर, माझी आई खूप खूश झाली. कारण, तिची देवाने प्रार्थना ऐकली असे तिला वाटते. मात्र, माझ्या वडिलांना दुस-या देशात जाऊन शिक्षण घेण्यासंदर्भात थोडी शंका होती. आता अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याची आणि माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याची संधी मला मिळेल, असे सुदीक्षा भाटी हिने सांगितले. 
विद्याज्ञान लीडरशीप अकादमीची स्थापना 2009 मध्ये शिव नडार फाउंडेशनकडून करण्यात आली आहे. सद्दस्थितीला बुलंदशहर आणि सीतापूरमधील 1900 हून अधिक गरीब कुटुंबातील मुले या अकादमीत शिक्षण घेत आहेत. 

Web Title: A tea vendor's daughter got 3.8 crores scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.