तलाक विधेयकावरून भाजपविरोधात टीडीपी, एनडीएला राज्यसभेत मोठा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 3:46am

तोंडी तलाकच्या विधेयकावर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) राज्यसभेत मोठा धक्का बसला. एनडीएचा महत्वाचा घटक पक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सी. एम. रमेश यांचे नाव हे विधेयक निवड समितीकडे पाठवावे अशी मागणी करणा-यांच्या यादीत पाहून भाजपचे अध्यक्ष अमित शाह व राज्यसभेतील पक्षाचे नेते अरूण जेटली यांना धक्काच बसला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली - तोंडी तलाकच्या विधेयकावर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) राज्यसभेत मोठा धक्का बसला. एनडीएचा महत्वाचा घटक पक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सी. एम. रमेश यांचे नाव हे विधेयक निवड समितीकडे पाठवावे अशी मागणी करणा-यांच्या यादीत पाहून भाजपचे अध्यक्ष अमित शाह व राज्यसभेतील पक्षाचे नेते अरूण जेटली यांना धक्काच बसला. विधेयक जेव्हा मतदानाला येईल त्यावेळी विरोधी पक्ष आपल्या बाजुने उभे राहतील व बहुमत मिळवता येईल अशी आशा भाजपला होती. विधेयकाच्या सध्याच्या स्वरुपाला विरोध असलेल्या खासदारांची नावे काँग्रेसने जाहीर केली त्यात सी. एम. रमेश यांचे नाव होते. विशेष म्हणजे तेलगू देसमने लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. टीडीपीची ही कोलांटउडी धक्कादायक होती कारण राज्यसभेत या पक्षाचे सहा खासदार आहेत. भाजपला द्रमुक आणि अण्णाद्रमुकचा पाठिंबा मिळवण्यातही अपयश आले. या दोन्ही पक्षांचे १७ खासदार आहेत. भाजप आणि तेलगू देसम पक्ष यांच्यात फार काही चांगले नाही हे स्पष्ट आहे. टीडीपीने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवायचा हा काही पहिला प्रसंग नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या शपथविधी समारंभालाही उपस्थित नव्हते. आंध्र प्रदेशबद्दल भाजपच्या दृष्टिकोनामुळे नायडू असमाधानी असून संधी मिळताच त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली. धक्का बसलेल्या भाजपने सभागृहाचे कामकाज विस्कळीत केले व त्यामुळे ते तहकूब करावे लागले. भाजप व टीडीपीत पडलेले अंतर शूभ संकेत नाहीत. सी. एम. रमेश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्याच्या स्वरुपातील विधेयकाला विरोध करण्याच्या पक्षाच्या आदेशाचे मी पालन केले.

संबंधित

... म्हणून विरोधक ईव्हीएमला 'व्हिलन' ठरवत आहेत - नरेंद्र मोदी
विरोधक पसरवताहेत भाजपा संविधान बदलवणार असल्याच्या अफवा, मुख्यमंत्र्यांची टीका 
भाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त
मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची दगडानं ठेचून निर्घृण हत्या
पंतप्रधान साधणार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांशी संवाद!

राष्ट्रीय कडून आणखी

 साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला
साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार
मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर
Jammu Kashmir : बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पुद्दुकोट्टाईत जलिकट्टू दरम्यान दोघांचा मृत्यू, 31 जण जखमी

आणखी वाचा