The Tamil Nadu government has fewer votes; Governor of Delhi in Delhi, given information given to the Center | तामिळनाडू सरकार अल्प मतात; राज्यपाल पुरोहित दिल्लीत, केंद्राला देणार परिस्थितीची माहिती

- हरिश गुप्ता

नवी दिल्ली : तामिळनाडूतील पलानीसामी सरकारला विधानसभेतील २३४ पैकी जेमतेम ११७ आमदारांचाच पाठिंबा राहिल्याने ते सरकार पडण्याच्या शक्यतेमुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह यांना त्याची माहिती देतील.
आर. के. नगरमधील पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या टीटीव्ही दिनकरन यांनी पलानीस्वामी सरकार पडायची वेळ आल्यास आपण द्रमुकला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्यासोबतच्या बंडखोर १८ आमदारांना अपात्र ठरविलेले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा राजकीय अस्थिरतेत राज्यात राष्ट्रपती राजवट कधीही येऊ शकते असेही वातावरण आहे. केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे तामिळनाडूचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस-द्रमुकच्या हालचाली
पलानीसामी सरकार पडू नये अशी केंद्राची इच्छा आहे. पण आपण राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करीत नसल्याची दक्षता केंद्र सरकार घेत आहे. पुरोहित राज्यपाल या नात्याने अस्थिर राजकीय स्थिती नीट हाताळतील, अशी खात्री नरेंद्र मोदी यांना आहे. पलानीसामी सरकार पाडण्यासाठी दिनकरन व काँग्रेस-द्रमुक हालचाली करत आहे.


Web Title: The Tamil Nadu government has fewer votes; Governor of Delhi in Delhi, given information given to the Center
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.