ताजमहालात रोज फक्त ४० हजारांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 1:53am

जगप्रसिद्ध ताजमहाल परिसरात रोज फक्त ४0 हजार पर्यटकांना प्रवेश द्यायचा विचार पुरातत्व विभाग (एएसआय) करीत आहे. याशिवाय भुयारी खोलीत प्रवेशासाठी तिकीट आकारणे आणि १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेशाचाही विचार सुरू आहे.

आग्रा - जगप्रसिद्ध ताजमहाल परिसरात रोज फक्त ४0 हजार पर्यटकांना प्रवेश द्यायचा विचार पुरातत्व विभाग (एएसआय) करीत आहे. याशिवाय भुयारी खोलीत प्रवेशासाठी तिकीट आकारणे आणि १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेशाचाही विचार सुरू आहे. या निर्णयांमुळे गर्दीचे व्यवस्थापन व किती पर्यटक भेट देतात हे नेमकेपणे समजेल. सध्या पर्यटन हंगामात व अनेकदा ताज महालला भेट देणा-यांची संख्या ६० ते ७० हजारांतही असतात. या प्रचंड संख्येमुळे ताज महालच्या पायाला इजा पोहोचू शकते, असे एएसआयच्या अधिका-याने सांगितले. यापुढे १५ वर्षांखालील मुले व ज्यांना प्रवेश विनामूल्य आहे अशा अतिविशिष्ट व्यक्तींसह सगळ््यांना बारकोड असलेली तिकीटे दिली जावीत व सर्र्वावर इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी लक्ष ठेवले जावे, यासाठीचे उपाय योजण्यात येणार आहेत.

संबंधित

गोव्यात आता बारमाही पर्यटन 
नाणे मावळ परिसर : निसर्गरम्य गावांची पडतेय भुरळ
पालघर जिल्हा पर्यटनाचे कंबरडे मोडले, जिल्हाधिकाऱ्यांचा तुघलकी आदेश
विदर्भ पर्यटनासाठी १०६ कोटी मंजूर; मिळाले २१.२५ कोटी
'ताजमहालमध्ये आता करता येणार नाही नमाज पठण'

राष्ट्रीय कडून आणखी

३,०४० हज यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला निरोप
गरीब रथ एक्स्प्रेसचा प्रवास महागणार!
डिझेल चोरल्याचा संशयातून तिघांना नग्न करून मारहाण
मोदींची मनोवृत्ती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय, काँग्रेसचा पलटवार
दहशतवादविरोधी सरावात सहभागी होणार भारत-पाक

आणखी वाचा