सुषमा स्वराज यांची चतुराई, राजकारण संन्यासावरून थरुरांना टोला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:52 AM2018-11-21T10:52:06+5:302018-11-21T11:22:00+5:30

सुषमा स्वराज भलेही 2019ची लोकसभा निवडणूक लढणार नसतील, पण राजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

sushma swaraj said i am not retiring from politics only not contesting 2019 lok sabha election | सुषमा स्वराज यांची चतुराई, राजकारण संन्यासावरून थरुरांना टोला!

सुषमा स्वराज यांची चतुराई, राजकारण संन्यासावरून थरुरांना टोला!

googlenewsNext
ठळक मुद्देराजकारणात सक्रीय राहणार - सुषमा स्वराजप्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा 2019 लढवणार नाही - स्वराज निवडणूक न लढवण्याचा निर्णय अमित शहांना सांगितला - स्वराज

नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची घोषणा केली आहे. सुषमा स्वराज भलेही 2019ची लोकसभा निवडणूक लढणार नसतील, पण राजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना स्वराज यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. 

'मी राजकारणातून निवृत्ती घेत नाहीय, तर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे 2019ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे',असा टोला स्वराज यांनी शशी थरुर यांना हाणला आहे. सुषमा स्वराज यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) इंदुरमध्ये पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली. सुषमा स्वराजांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटले की, 'अनेक राजकीय मतभेद असतानाही, सुषमा स्वराज राजकारण सोडत असल्यानं मी दुःखी झालो आहे'. 


शशी थरुर यांच्या ट्विटला सुषमा स्वराज यांनी अतिशय चतुराईनं उत्तर दिलं. थरुर यांना धन्यवाद देत त्यांनी म्हटलं की, ''आपण दोघांनीही पक्षाकडून आपल्याला देण्यात पदांवर कार्य करत राहावे, अशी मी आशा व्यक्त करते''.   



दरम्यान, इंदुरमधील पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा यांनी असेही सांगितले की, माझ्या  निर्णयाची कल्पना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. परंतु भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये जावं लागत आहे. अशातच कामाचा त्यांच्यावर ताण पडतो. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या त्या मध्य प्रदेशात असून, भाजपाचा प्रचार करत आहेत.

Web Title: sushma swaraj said i am not retiring from politics only not contesting 2019 lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.