surya grahan 2018: year's first solar eclipse will be beneficial to these 'four' zodiac signs | सूर्यग्रहणानंतर 'या' चार राशींच्या व्यक्तींचं फळफळणार नशीब
सूर्यग्रहणानंतर 'या' चार राशींच्या व्यक्तींचं फळफळणार नशीब

नवी दिल्ली- 2018 या वर्षात येणा-या तीन सूर्यग्रहणांपैकी पहिलं ग्रहण 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार असून, हे ग्रहण 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4 वाजता संपणार आहे. सूर्यग्रहण रात्री होणार असल्यानं भारतीय उपखंडात पाहायला मिळणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणाचा प्रभाव राशी, प्रकृती आणि मनुष्यावर पडतो. विशेष म्हणजे या सूर्यग्रहणानंतर चार राशींच्या  व्यक्तींचं नशीब चमकणार आहे. राशींवर ग्रहणाचा परिणाम हा 16 फेब्रुवारीनंतर पाहायला मिळणार आहे.

ग्रहणाला 15 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणार असून, ते 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4.18 वाजेपर्यंत राहणार आहे. 15 फेब्रुवारीला लागणारं सूर्यग्रहण हे 2018च्या वर्षातील पहिलं ग्रहण आहे. यानंतर 13 जुलै रोजी दुसरं सूर्यग्रहण पडणार आहे. तर 11 ऑगस्टला तिसरं सूर्यग्रहण लागणार असून, पूर्व यूरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि आर्क्टिकमध्ये दिसणार आहे.

या चार राशींच्या व्यक्तींचं फळफळणार नशीब
मेष- 16 फेब्रुवारीनंतर मेष राशीच्या लोकांना याचा फायदा पोहोचण्याची शक्यता आहे. या राशी असलेल्या लोकांच्या मान-सन्मानात वृद्धी होणार आहे. काही प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण होतील.
कन्या- तुमच्यासाठी येणारा काळ हा चांगला असेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल, तसेच तुम्ही शत्रूवरही विजय मिळवाल. 
वृश्चिक- तुमच्यासाठी येता काळ हा यश मिळवून देणारा असेल. तुमच्याकडे नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. तसेच तुम्ही करत असलेल्या कामात फायदा मिळण्याचाही योग आहे. 
धनू- या राशी असलेल्या व्यक्तींच्या इच्छाशक्तीमध्ये वाढ होण्याची आशा आहे. तसेच प्रवासात तुम्हाला मोठा फायदा होण्याचा योग आहे. 

English summary :
Surya Grahan 2018: This Year's first solar eclipse will be beneficial to these 'four' zodiac signs.

Get Live Updates & Latest Marathi News on Lokmat.com


Web Title: surya grahan 2018: year's first solar eclipse will be beneficial to these 'four' zodiac signs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.