सर्वेक्षण! संगणकामुळे होऊ शकतो व्हिजन सिंड्रोमचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:25 AM2018-08-30T06:25:29+5:302018-08-30T06:26:08+5:30

एकटक स्क्रीनकडे पाहणे ठरू शकते घातक

Survey! Computer troubles can be caused by Vision syndrome | सर्वेक्षण! संगणकामुळे होऊ शकतो व्हिजन सिंड्रोमचा त्रास

सर्वेक्षण! संगणकामुळे होऊ शकतो व्हिजन सिंड्रोमचा त्रास

googlenewsNext

बंगळुरू : तुम्ही कार्यालयात वा घरी अनेक तास संगणकावर काम करीत असताना तुम्ही पापणीही न हलवता एकटक स्क्रीनकडे पाहत असाल, तर तुम्हाला 'कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' या आजाराला तोंड द्यावे लागेल. एका सर्वेक्षणावर आधारित संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

अलीकडे सर्वच कार्यालयांचे काम संगणकावर चालते. त्यावरच काम करण्याची सवय झाल्याने अनेकांना आता पूर्वीप्रमाणे वळणदार अक्षरांत लिहिता येणेही अवघड झाले आहे. सतत संगणकासमोर बसणे आरोग्यासाठी धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
येथील डॉ. अग्रवाल यांच्या नेत्र रुग्णालयाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ५० ते ६० टक्के लोकांच्या डोळ्यातील अश्रू तयार करणऱ्या ग्रंथींवर संगणकाच्या स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने परिणाम होत असल्याचे आढळले आहे. डोळे निरोगी ठेवायचे असतील तर ते सतत ओलसर राहायला हवेत. पण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम'मुळे डोळे ओलसर राहण्यात अडथळे येतात. एवढेच नव्हे, तर डोळ्यांची आग होते, डोळ्यांतून पाणी येणे आणि त्याचबरोबर डोकेदुखी व मानदुखी हे त्रास सुरू होतात, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Survey! Computer troubles can be caused by Vision syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.