शिवसेनेच्या दबावामुळे सुरेश प्रभू मंत्री नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:56 AM2019-05-31T03:56:40+5:302019-05-31T03:57:04+5:30

सूत्रांनुसार भाजपची प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती. त्यांना रेल्वे, नागरी उड्डयन किंवा दुसरे कोणते महत्वाचे मंत्रालय देऊन त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा घ्यायचा अशी भाजपची योजना होती.

Suresh Prabhu is not a minister because of Shiv Sena's pressure | शिवसेनेच्या दबावामुळे सुरेश प्रभू मंत्री नाहीत

शिवसेनेच्या दबावामुळे सुरेश प्रभू मंत्री नाहीत

Next

नवी दिल्ली : मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सुरेश प्रभू यांचा समावेश नसल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागच्या मंत्रिमंडळात प्रभू यांचा समावेश शिवसेनेचा विरोध असूनही होता. त्यांची सरकारचे कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख होती.
परंतु, यावेळी शिवसेनेच्या दबाबापुढे भाजपला वाकावे लागले. शिवसेनेकडून भाजपवर प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायचे नाही, असे दडपण होते. याच कारणामुळे प्रभू मंत्री बनू शकले नाहीत, असे मानले जात आहे.

सूत्रांनुसार भाजपची प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती. त्यांना रेल्वे, नागरी उड्डयन किंवा दुसरे कोणते महत्वाचे मंत्रालय देऊन त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा घ्यायचा अशी भाजपची योजना होती. परंतु, शिवसेनेला हे समजताच तिने त्यांना विरोध सुरू केला.
शिवसेनेसोबत प्रदीर्घकाळ शांतता राखण्यासाठी भाजपने प्रभू यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.

मित्रपक्षांसोबत तणातणी
भाजपचा त्याच्या मित्रपक्षांसोबत मंत्रिमंडळावरून समन्वय पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसत नाही. याचे संकेत फक्त जदने (यु) मंत्रिमंडळात सहभागी न होऊन दिले, असे नाही तर उत्तर प्रदेशातून अपना दलदेखील सरकारमध्ये सहभागी झालेला नाही. याच प्रकारे दक्षिणेतूनही कोणता मोठा सहकारी पक्ष मोदी सरकारमध्ये आलेला नाही.

Web Title: Suresh Prabhu is not a minister because of Shiv Sena's pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.