अमेठीमध्ये स्मृती इराणींचे निकटवर्तीय असलेल्या माजी सरपंचांची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 08:07 AM2019-05-26T08:07:08+5:302019-05-26T08:14:56+5:30

अमेठीमध्ये स्मृती इराणींचे निकटवर्तीय असलेल्या माजी सरपंचांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Surendra Singh, former village head of Baraulia village was shot dead | अमेठीमध्ये स्मृती इराणींचे निकटवर्तीय असलेल्या माजी सरपंचांची हत्या 

अमेठीमध्ये स्मृती इराणींचे निकटवर्तीय असलेल्या माजी सरपंचांची हत्या 

Next

लखनौ - अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचे ते निकटवर्तीय होते. तसेच त्यांनी सरपंचपद भूषवलेल्या बरौलिया गावाला मनोहर पर्रिकर यांनी दत्तक घेतले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुरेंद्र सिंह हे घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. तसेच संपूर्ण परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 




नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होतीय सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना लाभ मिळाला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी सुरेंद्र सिंह यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची चिंताजनक प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना लखनौ ट्रॉमा सेंटर येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र लखनौ येथे जात असताना सुरेंद्र सिंह यांची प्राणज्योत मालवली.  

Web Title: Surendra Singh, former village head of Baraulia village was shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.