देशभरात ‘नीट’ परीक्षा होणार ६ मे रोजी; आॅनलाइन अर्जासाठी ९ मार्चपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:40am

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने ही घोषणा केली आहे. यासाठीचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार, ८ पासून सुुरू झाली आहे. ही प्रक्रिया ९ मार्चला रात्री ११.५० पर्यंत चालणार आहे.

नवी दिल्ली : एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने ही घोषणा केली आहे. यासाठीचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार, ८ पासून सुुरू झाली आहे. ही प्रक्रिया ९ मार्चला रात्री ११.५० पर्यंत चालणार आहे. आॅनलाइन फी जमा करण्याची मुदत १० मार्च राजी रात्री ११.५० पर्यंत आहे. आसाम, जम्मू-काश्मीर ङ्म मेघालय येथील अर्जदार वगळता उर्वरित सर्वांसाठी आधार नंबर जमा करणे अनिवार्य आहे. जर आधार नंबर, नाव, जन्मतारीख अथवा लिंग याबाबत माहितीत फरक आढळल्यास उमेदवार अर्ज दाखल करु शकणार नाहीत. एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी वयोमर्यादा १७ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय प्रवेशाच्या वेळी १७ वर्षे असायला हवे अथवा ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी उमेदवार १७ वर्षांचा असायला हवा. या प्रवेश परीक्षेच्या वेळी अधिकाधिक वयोमर्यादा २५ वर्षे असायला हवी. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठी तसेच अपंग व्यक्तीचे हक्क कायदा २०१६ नुसार त्यांना वयामध्ये ५ वर्षांची सूट असणार आहे. कोण देऊ शकतो परीक्षा? विद्यार्थी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, भौतिक, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये एकत्रित किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. www.cbseneet.nic.in या बोर्डाच्या वेबसाइटवर विद्यार्थी फक्त आॅनलाइन अर्ज करु शकतात.

संबंधित

वाशिम येथे २४२ विद्यार्थ्यांनी दिली बाल वैज्ञानिक परीक्षा
ज्ञान-विज्ञान अंतिम परीक्षेसाठी १४ हजार विद्यार्थ्यांमधून ५७७ विद्यार्थ्यांची निवड!
यंदा दहावी, बारावी परीक्षेचे क्रीडा, चित्रकलेचे गुण नाहीत!
सीए, एसवायबीकॉमचा पेपर एकाच दिवशी; विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलली
दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

राष्ट्रीय कडून आणखी

एफ-१६ विमाने घेतल्यास आर्थिक निर्बंध नाही
भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात
भ्रष्टाचारासाठी ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलविले, राहुल गांधींचा घणाघाती आरोप 
#AmritsarTrainAccident : रावणदहनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी दिली होती परवानगी 
हिंमत असेल तर अग्रलेखांची लेखणी मोडा आणि सत्ता सोडा, ओवेसींचे शिवसेनेला आव्हान 

आणखी वाचा