ठळक मुद्देकॉम्प्युटर सायन्ससारख्या विषयात दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेली पदवी आणि त्याच विषयात नियमित वर्गात हजेरी लावून मिळवलेली पदवी यामध्ये फरक असेल.

नवी दिल्ली - तंत्र शिक्षणाच्या बाबातीत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्वपूर्ण निकाल दिला. कॉरस्पोन्डेन्स म्हणजे पत्र व्यवहाराच्या माध्यमातून चालणारे तंत्र शिक्षणाचे कोर्सेस शैक्षणिक संस्थांनी बंद करावेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. इंजिनिअरिंग सारख्या विषयांचे अभ्यासक्रम पत्रव्यवहाराच्या माध्यमातून चालवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. 

दूरस्थ शिक्षणातील तंत्र शिक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. ओदिशा उच्च न्यायालयाने  कॉरस्पोन्डेन्सच्या माध्यमातून तंत्र शिक्षणाला अनुमती दिली होती. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवला. 

कॉम्प्युटर सायन्ससारख्या विषयात दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेली पदवी आणि त्याच विषयात नियमित वर्गात हजेरी लावून मिळवलेली पदवी यामध्ये फरक असेल. दोघांना एकसमान दर्जा मिळणार नाही असा निकाल दोनवर्षांपूर्वी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दिला होता. पत्र व्यवहाराच्या माध्यमातून तंत्र शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टीक्लसचा अनुभव नसतो. त्यातुलनेत नियमित वर्गात हजर असणा-या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीक्लसचा भरपूर सराव असतो.