अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:54 AM2019-05-26T03:54:42+5:302019-05-26T03:55:00+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या प्रचंड यशामागे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नियोजन किती अचूक होते हे सिद्ध झाले.

Success of Amit Shah's Team of Success | अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश

अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश

Next

- नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या प्रचंड यशामागे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नियोजन किती अचूक होते हे सिद्ध झाले. हे नियोजन प्रत्यक्ष राबवले त्यांच्या विश्वासू टीमने. शहा हे लवकर कोणावर विश्वास ठेवत नाहीत व एकदा ज्याच्यावर ठेवला तर त्याच्या पाठीशी ठामपणे राहतात, असे सांगण्यात येते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे प्रमुखपद सांभाळताना आपला विश्वास मिळवलेल्या लोकांची एक गाभा समिती शहा यांनी बनवली. तीत कैलाश विजयवर्गीय, जे. पी. नद्दा, अरुण सिंह, प्रकाश जावडेकर, भूपेंद्र यादव, अनिल जैन, अनिल बलुनी या मंडळींनीच शहा यांचा विश्वास ताज्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड यशात बदलून दाखवला.
।कैलाश विजयवर्गीय
भाजपचा प. बंगालमध्ये विस्तार करण्यासाठी शहा यांनी सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना निवडले. त्यांच्यासोबत सहप्रभारी अरविंद मेनन हे होते.
>अरुण सिंह
गेल्या वर्षी पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांना ओडिशाचे प्रभारी बनवले गेले होते. त्यांनी स्थानिक मुद्दे घेऊन रणनीती बनवली. शिवाय बी.जे. पांडा यांच्यासारखा नेता पक्षात आणला.
>प्रकाश जावडेकर
जावडेकर यांनी राज्यातील विस्कळीत पक्ष नीट केला. जाट, गुजर समाजाची मते मिळण्यासाठी जावडेकर यांनी वसुंधरा राजे यांचे मन वळवले.
>अनिल जैन
अनिल जैन यांच्याकडे हरियाणा व छत्तीसगडचा प्रभार दिला गेला होता. छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांची तिकिटे कापली. तरीही जैन यांनी पक्षात असंतोष निर्माण होऊ दिला नाही.
>भूपेंद्र यादव
गुजरात, राजस्थान विधानसभा निवडणुकीत यादव यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांचे काम आणि कौशल्ये पाहून त्यांच्याकडे मोदी, शहा यांच्या प्रचार सभांच्या आयोजनाचे काम होते.
>अनिल बलुनी
भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलुनी यांनी मोदी, शहा आणि पक्षाच्या बातम्या प्रसारमाध्यमांत ठळकपणे कशा दिसतील यावर सातत्याने काम केले.

Web Title: Success of Amit Shah's Team of Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.