रजनीकांत-हासन यांच्यात संघर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 1:46am

राजकारणाच्या आखाड्यात रजनीकांत व कमल हासन यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करू नये, असे अभिनेते रजनीकांत यांनी सांगितले होते. तर गुरुवारी कमल हासन यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करायला हवा, अशी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे.

चेन्नई - राजकारणाच्या आखाड्यात रजनीकांत व कमल हासन यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करू नये, असे अभिनेते रजनीकांत यांनी सांगितले होते. तर गुरुवारी कमल हासन यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करायला हवा, अशी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हासन म्हणाले की, तुम्ही राजकारणात जाऊन तमिळनाडूला पुढे न्यावे, असे मला वाटते व मक्कल निधी मय्यमला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी न चुकता मतदान करावे. तर रजनीकांत यांनी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला. परंतु, त्यांनी राजकारणापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे सांगून त्यांचे चेहरे हिरमुसले केले.

संबंधित

कृषीसंशोधनात राजकीय इच्छाशक्तीची गरज  : डॉ.एम.एस.स्वामीनाथन 
महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन आणि रंगलेले राजकारण 
'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ
BJP-PDP घटस्फोटावर ओमर अब्दुल्लांची टीका, वादग्रस्त फिल्मचा सीन केला शेअर  
सदाभाऊंपुढे खासदार-आमदारांचे आव्हान : ‘हातकणंगले’त संपर्क वाढविला

राष्ट्रीय कडून आणखी

कमल हासन यांची दिल्लीत राहुल, सोनिया गांधींशी चर्चा
बंदमुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत, यासिन मलिक, सय्यद गिलानी, मिरवाईज स्थानबद्ध
बिहारमधील पाच अल्पवयीन मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा
तेलंगणात मुलांना मारून पत्रकाराची आत्महत्या
एटीएमच्या सुरक्षेबाबत बँका निष्काळजी

आणखी वाचा