The struggle between Rajinikanth and Hassan continues | रजनीकांत-हासन यांच्यात संघर्ष सुरू
रजनीकांत-हासन यांच्यात संघर्ष सुरू

चेन्नई - राजकारणाच्या आखाड्यात रजनीकांत व कमल हासन यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करू नये, असे अभिनेते रजनीकांत यांनी सांगितले होते. तर गुरुवारी कमल हासन यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करायला हवा, अशी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हासन म्हणाले की, तुम्ही राजकारणात जाऊन तमिळनाडूला पुढे न्यावे, असे मला वाटते व मक्कल निधी मय्यमला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी न चुकता मतदान करावे. तर रजनीकांत यांनी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला. परंतु, त्यांनी राजकारणापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे सांगून त्यांचे चेहरे हिरमुसले केले.


Web Title:  The struggle between Rajinikanth and Hassan continues
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.