पुतळ्यांवर राजकीय घाव, देशभरात विटंबना सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:56 AM2018-03-08T05:56:27+5:302018-03-08T05:56:27+5:30

लेनिन, तामिळनाडूतील द्रविडी चळवळीचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसुधारक ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्यांची तोडफोड केल्यानंतर उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांचीही बुधवारी विटंबना करण्यात आली.

 State wounds on statues, irresponsible sessions across the country | पुतळ्यांवर राजकीय घाव, देशभरात विटंबना सत्र

पुतळ्यांवर राजकीय घाव, देशभरात विटंबना सत्र

Next

कोलकाता/चेन्नई/नवी दिल्ली - लेनिन, तामिळनाडूतील द्रविडी चळवळीचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसुधारक ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्यांची तोडफोड केल्यानंतर उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांचीही बुधवारी विटंबना करण्यात आली.
या महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याच्या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. केली. तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला.
पेरियार यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे तीव्र पडसाद आज तामिळनाडूमध्ये उमटले. भाजपाचे सचिव एच. राजा यांनी मंगळवारी पेरियार यांचा पुतळा पाडला जायला हवा, असे वक्तव्य केल्यानंतर हा प्रकार घडला. राजा यांनी आज दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यांच्या अटकेसाठी द्रमुक व अनेक संघटनांनी जोरदार निदर्शने केली. राजा यांच्या प्रतिमांचे दहन करून चेन्नई, कुड्डुलोर व सालेमसह अन्य भागांतही संतप्त निदर्शने केली. चेन्नईत भाजप मुख्यालयाला
घेराव घातला. भाजपाच्या कोर्इंबतूर कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. विटंबना करणाºया कार्यकर्त्याची भाजपने हकालपट्टी केली आहे.

जानवी कापली
रामस्वामी ‘पेरियार’ यांचे पुतळेही पाडायला हवेत, या भाजपा नेत्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी चेन्नई शहराच्या मैलापूर भागात ‘डीव्हीके’ या द्राविडी संघटनेच्या लोकांनी आठ ब्राह्मणांच्या गळ््यातील जानवी जबरदस्तीने कापली. ते आठ जण ‘मॉर्निंग वॉक’ करीत होते. चार जण तिथे आले आणि कोणाच्या गळ््यात जानवे आहे हे तपासून ज्यांच्या गळ््यात जानवी होती ती तोडून पळ काढला. नंतर ‘Þडीव्हीके’चे चार कार्यकर्ते स्वत:हून रॉयापेठ पोलीस ठाण्यात आले व सकाळी आपण जानवी तोडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

सात अटकेत
कोलकात्यात श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याचीही नासधूस केल्याचे आढळून आले. त्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना लगेच अटक केली. त्यानंतरच भाजपा नेत्यांनी सर्व पुतळ्यांची काळजी घ्यायला हवी, असे सांगत सर्वच पुतळ्यांच्या तोडफोडीचा निषेध केला.

कोंडदेव प्रतिमेवरुन पुण्यात वादावादी
लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्यानंतर महापालिकेकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अ. भा. ब्राह्मण महासंघाने बुधवारी पालिकेच्या आवारातच दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मात्र, त्यावरून संभाजी ब्रिगेड व महासंघाच्या पदाधिकाºयांमध्ये वादावादी झाली. - वृत्त/७

लगेच बसवला दुसरा पुतळा
मेरठ जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे दिसून आले. मात्र प्रकरण चिघळण्याआधीच पोलिसांनी त्या ठिकाणी दुसरा पुतळा आणून बसवला. संपूर्ण उत्तर प्रदेशात सर्वच पुतळ्यांपाशी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Web Title:  State wounds on statues, irresponsible sessions across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.