SBIच्या ग्राहकांना खुशखबर, ATM मधून काढा कितीही वेळा पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:44 PM2018-12-04T14:44:12+5:302018-12-04T14:46:16+5:30

स्टेट बँकेच्या ग्राहकांना आतापर्यंत एटीएममधून पैसे काढताना काही बंधने होती. मात्र आता ग्राहकांना दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार करता येणार आहेत.

state bank of india offers unlimited free atm transaction | SBIच्या ग्राहकांना खुशखबर, ATM मधून काढा कितीही वेळा पैसा

SBIच्या ग्राहकांना खुशखबर, ATM मधून काढा कितीही वेळा पैसा

googlenewsNext
ठळक मुद्देस्टेट बँकेच्या ग्राहकांना आतापर्यंत एटीएममधून पैसे काढताना काही बंधने होती.ग्राहकांना दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार करता येणार आहेत. एटीएममधून तुम्हाला हवे तेवढे पैसे काढायचे असल्यास खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार आहे.

नवी दिल्ली - स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. काही दिवसांपूर्वीच जुन्या चेक बुकबाबत घोषणा केल्यानंतर आता बँकेने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांना आतापर्यंत एटीएममधून पैसे काढताना काही बंधने होती. मात्र आता ग्राहकांना दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार करता येणार आहेत. यासाठी बँकेने एक अट घातली आहे.

एटीएममधून तुम्हाला हवे तेवढे पैसे काढायचे असल्यास खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार आहे. अनलिमिटेड एटीएम व्यवहार करण्यासाठी दर महिन्याला सरासरी 1 लाख रुपये ठेवणे बंधनकारक आहे. तरच ग्राहक एटीएम कार्डद्वारे अनलिमिटेड व्यवहार करू शकता. ग्राहकांना दर महिन्याला काही ठराविक वेळा फ्री आणि अनलिमिटेड व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी असा आदेश रिझर्व्ह बँकेने एसबीआयला दिला आहे.

स्टेट बँकेने याआधी 31 ऑक्टोबर 2018 पासून आपल्या 'क्लासिक' आणि 'माइस्ट्रो' या डेबिट कार्डधारकांसाठी एटीएममधून रक्कम काढण्याची दैनंदिन मर्यादा 40 हजार रुपयांवरून 20 हजार रुपयांवर आणली आहे. सध्या एसबीआयचे ग्राहक दर महिन्याला आठ वेळा एटीएमने व्यवहार करू शकतात. त्यातील पाच वेळा ग्राहकांना एसबीआयची एटीएम मशीन वापरावी लागते. तर तीन वेळा ते इतर कोणत्याही ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.

Web Title: state bank of india offers unlimited free atm transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.