स्पेशल फोर्स हाच माझा धर्म व जात! अनेकांना भावली व्हिडीओ क्लिप

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:53am

‘स्पेशल फोर्स’ म्हणजे भारतीय सैन्य दल हाच माझा धर्म आहे आणि तीज माझी जातही आहे, अशा शब्दांत धर्मनिरपेक्ष समाजाचे समर्थन करणारे कर्नल सौरभ सिंह शेखावत यांचा एक मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली : ‘स्पेशल फोर्स’ म्हणजे भारतीय सैन्य दल हाच माझा धर्म आहे आणि तीज माझी जातही आहे, अशा शब्दांत धर्मनिरपेक्ष समाजाचे समर्थन करणारे कर्नल सौरभ सिंह शेखावत यांचा एक मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मी फोर्समध्ये रुजू झालो असता वरिष्ठांनी विचारले की, तुमचा धर्म, जात काय आहे? मी सांगितले की, हिंदू राजपूत. त्यावर ते चिडून म्हणाले की, जा आणि पाण्यात बुडी मारुन या. मी त्याप्रमाणे केले. नंतर मला जाणीव झाली की, मी काहीतरी चुकीचे सांगितले आहे. शेखावत म्हणाले की, त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि मी उत्तर दिले की, स्पेशल फोर्स हाच माझा धर्म आणि जात आहे. शेखावत म्हणतात की, हीच पद्धत सर्व भारतवासियांनी मान्य केली, तर देशातील बहुतांश समस्या सुटतील. शेखावत यांचे व्टिट ४,५३३ वेळा शेअर करण्यात आले आहे. कीर्ति, शौर्य व सेना पदक कीर्ति चक्र, शौर्य चक्र व सेना पदक यांनी गौरविण्यात आलेले कर्नल सौरभ शेखावत भारतीय सैन्यातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांची ही व्हिडीओ क्लिप माजी सैन्य अधिकारी रघु रामन यांनी व्टिटरवर शेअर केली आहे.

संबंधित

Jammu Kashmir : बांदिपोरा येथील चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा 
Surgical Strike Day साजरा करण्यावरून 'युद्ध'; सरकारवर विरोधकांचा 'स्ट्राइक'
जवानाच्या क्रूर हत्येनंतर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट
वादग्रस्त मेजर गोगोई यांची बदली
दहशतवाद्यांकडून भारतीय जवानाची घरात घुसून हत्या

राष्ट्रीय कडून आणखी

लालू प्रसाद यादव गमावणार 128 कोटींची मालमत्ता; IT ने दिला 'जोर का झटका'
पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार
फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास; सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली ही वेळ
त्रिपुरामध्ये बसचा भीषण अपघात, 29 जवान जखमी 
भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी

आणखी वाचा