सोनिया गांधींचं केजरीवाल वगळता सर्व विरोधकांना भोजनाचं निमंत्रण

By admin | Published: May 25, 2017 10:40 AM2017-05-25T10:40:03+5:302017-05-25T11:55:31+5:30

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अनौपचारिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे.

Sonia Gandhi's invitation to all the opponents except for Kejriwal | सोनिया गांधींचं केजरीवाल वगळता सर्व विरोधकांना भोजनाचं निमंत्रण

सोनिया गांधींचं केजरीवाल वगळता सर्व विरोधकांना भोजनाचं निमंत्रण

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 - राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अनौपचारिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे. मात्र यावेळी सोनिया यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित करणे टाळले आहे.  
 
सोनिया गांधी यांनी शुक्रवारी (26 मे) विरोधी पक्षांसाठी भोजन समारंभाचे आयोजन केले आहे. याचदरम्यान विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा होणार आहे. ""लंच पे चर्चा""निमित्तानं, नरेंद्र मोदी सरकार तीन वर्ष पूर्ण करत असतानाच सरकारला विरोधकांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.   
 
विशेष म्हणजे  सोनिया गांधी यांनी भोजनासाठी स्वत: विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे.  विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांनी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं आहे.  माकपचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला हजेर राहणार आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी बुधवारीच नवी दिल्लीत दाखल झाल्या आहे. राष्ट्रपतीपद उमेदवाराबाबत बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत स्वतंत्रितरित्या चर्चादेखील केली आहे. 
 
सोनिया गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी वगळता अन्य विरोधी पक्षांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. आम आदमी पार्टीनं आतापर्यंत विरोधकांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग नोंदवला नसल्यानं त्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे. 

Web Title: Sonia Gandhi's invitation to all the opponents except for Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.