सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांचा राजीनामा, उच्च विधी अधिकाºयांच्या चमूला पुन्हा खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 05:20 AM2017-10-21T05:20:10+5:302017-10-21T05:20:13+5:30

देशातील उच्च विधी अधिकाºयांच्या चमूत पुन्हा खिंडार पडले आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर आता सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी राजीनामा दिला आहे.

 Solicitor General Ranjeetkumar resigns, remanded in high court | सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांचा राजीनामा, उच्च विधी अधिकाºयांच्या चमूला पुन्हा खिंडार

सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांचा राजीनामा, उच्च विधी अधिकाºयांच्या चमूला पुन्हा खिंडार

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशातील उच्च विधी अधिकाºयांच्या चमूत पुन्हा खिंडार पडले आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर आता सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी राजीनामा दिला आहे. सॉलिसिटर जनरल हे विधी अधिकाºयाचे दुसरे वरिष्ठ पद आहे. रोहतगी यांनी गेल्या जूनमध्ये राजीनामा दिल्यानंतर रणजितकुमारही पद सोडतील असे बोलले जात होते. ती चर्चा विलंबाने, पण खरी ठरली.
रणजितकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना पद सोडण्यामागील कारण सांगितले. गेल्यावर्षी वडिलांचे निधन झाले व आता आई आजारी आहे. आईची काळजी घ्यायची आहे असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी शासनासंदर्भात काहीच तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.
परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अख्त्यारितील कार्मिक विभागाने तीन महिन्यांपूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे विधी अधिकाºयांमध्ये अनिश्चिततेची भावना बळावली आहे. विधी अधिकाºयांची मुदतवाढ

ाुढील आदेशापर्यंतच राहील असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात कार्यकाळाचा निश्चित उल्लेख करण्यात आलेला नाही. रोहतगी व रणजितकुमार यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यापूर्वी दोघांनाही त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांपर्यंत किंवा शासन सत्तेत असेपर्यंत म्हणजे, मे-२०१९ पर्यंत वाढविला जाईल अशी अपेक्षा होती. दरम्यान, शासनाची रोहतगी यांना पदावर कायम ठेवण्याची तयारी असतानाही त्यांनी अधिसूचना अमान्य करून राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर रोहतगी यांनी खासगी वकिली करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्यासोबत रणजितकुमारही राजीनामा देतील असे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही व आता वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले. अलीकडे ते सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची प्रकरणे हाताळत नाहीत.

Web Title:  Solicitor General Ranjeetkumar resigns, remanded in high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.