#SHOCKING : सेल्फीच्या नादात गेला हत्तीच्या पिल्लाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 05:07 PM2018-01-18T17:07:15+5:302018-01-18T17:44:16+5:30

गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

#SHOCKING: baby elephant dead beacause of selfie fad | #SHOCKING : सेल्फीच्या नादात गेला हत्तीच्या पिल्लाचा जीव

#SHOCKING : सेल्फीच्या नादात गेला हत्तीच्या पिल्लाचा जीव

ठळक मुद्देमाणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत.मात्र कर्नाटकात घडलेली ही घटना तर त्या सरळ्या घटनांवर कहरच म्हणावी लागेल.त्या हत्तीच्या पिल्लाचा आगीने भाजून वेदनेत मृत्यू झाला मात्र नागरिक आपल्याच धुंदीत मश्गुल होते.

कर्नाटक : माणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. कर्नाटकमधूनही एक घटना समोर आली आहे ती म्हणजे गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याला त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने आणि माणसांच्या भितीमुळे या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

आणखी वाचा - आगीचे गोळे झेलणाऱ्या हत्तींच्या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार

दि इंडिया फिडने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या कुरुबाराहूंडी या गावात अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप आला होता. हत्तींनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचं वनाधिकाऱ्यांना कळलं तेव्हा त्यांनी हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हत्तींना हुसकावण्यासाठी आगीचे गोळे फेकले जातात. तसंच, या गावातील लोकांनीही हत्तींना बाहेर काढण्यासाठी आगींचे गोळे फेकले. घाबरलेल्या हत्तीचे कळप यामुळे मागे फिरले. पण कळपातलं एक पिल्लू मात्र तिथेच राहिलं. पिल्लू एकटं असल्याचं पाहून गावकरी त्या पिल्लाजवळ पोहोचले. हत्तीच्या पिल्लाला त्याच्या आईकडे पोहोचवण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले. आपलं पिल्लू मागे राहिलंय हे कळताच हत्तीची आई पुन्हा गावात आली. पण माणसांची गर्दी पाहता तिला पुढे येता आलं नाही. परिणामी हत्तीची आई पुन्हा माघारी फिरली. आगीचे गोळे फेकल्याने पिल्लू जखमी झालं होतं, त्यात इतर गावकरी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यात मग्न होते. शिवाय आई पुन्हा गावात आल्याचं पाहूनही त्या पिल्लाला तिच्यासोबत पाठवावंसं त्यांना वाटलं नाही. 

आणखी वाचा - आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

हा सगळा प्रकार वनाधिकाऱ्यांना कळला तेव्हा त्यांनी तातडीने जखमी पिल्लाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असतानाच पिल्लाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या पिल्लाला आपल्या आईचा विरह सहन न झाल्याने त्याचे प्राण गेले आणि या मृत्यूला तिच माणसं कारण ठरली. एका बाजूने आपण वन्यप्राण्यांची जागा हिसकावून घेत आहोत. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात. मानवी वस्तीत त्यांना मारच सहन करावा लागतो. शिवाय माणसांमधली भूतदया लोप पावत असल्याने मुक्या जनावरांचा हकनाक बळी जातोय.

Web Title: #SHOCKING: baby elephant dead beacause of selfie fad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.