Shocking... Army personal Honeytraped; He gave secret information to Pakistan | धक्कादायक ! पाकच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला भारतीय जवान, फोडली गुप्त माहिती
धक्कादायक ! पाकच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला भारतीय जवान, फोडली गुप्त माहिती

भारतीय सैन्यातील एक जवान पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जवानाला पाकिस्तानकडून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते. यामुळे इंटेलिजेंस ब्यूरो (IB), मिलिट्री इंटेलिजेंस आणि पोलीसांनी संयुक्त कारवाई करत या जवानाला अटक केली आहे. 


एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार हा जवान भारतीय सैन्यात लिपीक पदावर काम करत होता. त्याची माहिती देण्यात आली नसून तो मध्य प्रदेशच्या महू कॅन्टोन्मेन्टमध्ये इन्फंट्री बटालियनमध्ये कार्यरत होता. 


भारताच्या गुप्तचर संस्थांनी त्याला पाकिस्तानला माहिती पुरवत असताना पकडले आहे. यंत्रणेला संशय आहे की, त्याला ही माहिती देण्यासाठी हनी ट्रॅपमध्ये फसविण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
या जवानाचा मोबाईल आणि अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले असून तपास सुर झाला आहे. त्याच्या मोबाईलमधून महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. याआधीही अशी प्रकरणे समोर आली आहेत. 


Web Title: Shocking... Army personal Honeytraped; He gave secret information to Pakistan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.